जमिनीच्या वादातून महिलेस धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:35+5:302020-12-11T04:52:35+5:30

इचलकरंजी : जमिनीच्या वादातून महिलेस धक्काबुक्की करीत विनयभंग केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

Women pushed by land dispute | जमिनीच्या वादातून महिलेस धक्काबुक्की

जमिनीच्या वादातून महिलेस धक्काबुक्की

Next

इचलकरंजी : जमिनीच्या वादातून महिलेस धक्काबुक्की करीत विनयभंग केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी राजू इस्माईल अत्तार (वय २५, रा. टाकवडे वेस) यांनी तक्रार दिली आहे.

शैलेंद्र मलगोंडा पाटील, महादेवी मलगोंडा पाटील व अविनाश शंकर कोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, टाकवडे वेस परिसरात अत्तार यांची शेती आहे. या शेतजमिनीवरून वाद सुरू असून, त्यातूनच २८ नोव्हेंबरला सकाळी अत्तार यांचे वडील इस्माईल व आई हे दोघे शेतात काम करीत होते. त्यावेळी त्या ठिकाणी शैलेंद्र, महादेवी व अविनाश यांनी तेथे येऊन त्यांच्याशी वाद घातला. त्यातूनच या तिघांनी वडील व त्यांच्या आईला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच त्यांचा विनयभंग करीत धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Women pushed by land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.