आव्हाने पेलण्यासाठी महिलांनी सक्षम बनावे
By admin | Published: March 13, 2017 11:37 PM2017-03-13T23:37:55+5:302017-03-13T23:37:55+5:30
त्रिशला गौंडाजे : उदगावमध्ये पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर समितीतर्फे ज्येष्ठ महिलांचा सत्कार
जयसिंगपूर : आधुनिक काळात स्त्रियांवरील अत्याचार वाढत असून, तिला समाजाकडून संरक्षण मिळण्याची गरज आहे. या बदलत्या काळात स्त्रियांसमोर अनेक आव्हाने असून, ती पेलण्यासाठी महिलांनी सक्षम बनावे, असे आवाहन त्रिशला गौंडाजे यांनी केले.उदगाव (ता. शिरोळ) येथील श्री १००८ भ. पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर समिती व वीर महिला मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी गौंडाजे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पाठशाळेच्या माणीज भमाजे होत्या. संघनायिका सुनिता चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी मुनिश्री १०८ धर्मसागरजी महाराज, मुनिश्री १०८ समतासागरजी महाराज व मुनिश्री १०८ पार्श्वसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून स्त्रियांची धार्मिक व सामाजिक क्षेत्रांतील उपयोगिता व मानसन्मान देणे गरजेचे असल्याचा उपदेश दिला.
यावेळी इंदुबाई मगदूम, अलका देसाई, सुजाता मादनाईक, विमल चौगुले, मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश पाटील, सुनील कर्वे, बळवंत काडगे, सम्मेद चौगुले, आशा देसाई, उज्ज्वला मगदूम, वनिता चौगुले, लता पाटील, शोभा मादनाईक, उपस्थित होते.
उदगाव (ता. शिरोळ) येथील भगवान पार्श्वनाथ मंदिर समिती व वीर महिला मंडळाच्यावतीने ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश पाटील, सुनील कर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.