महिलांनी समाजकार्यात सक्रिय व्हावे : मिणचेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:18+5:302021-02-06T04:44:18+5:30

किणी : बदलत्या काळानुसार विविध क्षेत्रांमध्ये महिला प्रभावी कामगिरी करत असून, समाजकार्य व राजकारणात जास्तीत जास्त महिला सक्रियपणे सहभागी ...

Women should be active in social work: Minchekar | महिलांनी समाजकार्यात सक्रिय व्हावे : मिणचेकर

महिलांनी समाजकार्यात सक्रिय व्हावे : मिणचेकर

googlenewsNext

किणी : बदलत्या काळानुसार विविध क्षेत्रांमध्ये महिला प्रभावी कामगिरी करत असून, समाजकार्य व राजकारणात जास्तीत जास्त महिला सक्रियपणे सहभागी झाल्यास महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन लेखा सुजित मिणचेकर यांनी केले.

किणी (ता. हातकंणगले) येथील शिवसेना महिला आघाडी व वाडा ग्रुप यांच्यावतीने उपतालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मालती खोपडे व किणी ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लेखा मिणचेकर बोलत होत्या. शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख सुहास माने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलताई चव्हाण यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

शिवसेना महिला आघाडी हातकणंगले उपतालुका प्रमुखपदी मालती खोपडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा व नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पुष्पा आळतेकर, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सुवर्णा धनवडे, तालुकाप्रमुख उषाताई चौगुले, युवा सेनेचे उपजिल्हा अधिकारी राहुल पाटील, वारणेचे संचालक अॅड. एन. आर. पाटील, अनिल पाटील, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, हंबीरराव पाटील, मधुकर खोपडे, ग्रामपंचायत सदस्य रणजित निकम, हर्षद पाटील, नारायण कुंभार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. कुबेर पाटील यांनी केले तर प्रमोद खोपडे यांनी आभार मानले.

............................................................

फोटो ओळी .किणी (ता. हातकंणगले) येथे शिवसेना उपतालुका प्रमुख मालती खोपडे व नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लेखा मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलताई चव्हाण उपस्थित होत्या.

Web Title: Women should be active in social work: Minchekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.