महिलांनी भावी पिढी संस्कारक्षम घडविण्यासाठी जागरूक राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:21 AM2021-01-15T04:21:09+5:302021-01-15T04:21:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : नव्या बदलत्या युगात ग्रामीण भागातील महिलांनी भावी पिढी संस्कारक्षम घडविण्यासाठी जागरूक राहून आरोग्य, योग्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरवाडी : नव्या बदलत्या युगात ग्रामीण भागातील महिलांनी भावी पिढी संस्कारक्षम घडविण्यासाठी जागरूक राहून आरोग्य, योग्य आहार, व्यायाम याकडे लक्ष हवे, असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे यांनी केले.
कसबा बीड (ता. करवीर) येथे उपप्राथमिक आरोग्य केंद्रातर्फ राजमाता जिजाऊ माता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. मोरे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनिता जाधव होत्या.
चांगली पिढी तयार करण्याची जबाबदारी महिलांवर आहे. स्त्री परिवर्तनाचे विचार घरोघरी पोहोचविणे गरजेचे असल्याचे सांगून डॉ. मोरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊने आदर्श विचारांच्या बळावर घडविले, जिजाऊंचे आत्मचरित्र वाचने आवश्यक आहे.
डॉ. विनिता जाधव म्हणाल्या, गर्भसंस्कार योग्य आहार, व्यायाम यांची गरज आहे. त्यासाठी महिलांनी काळजी घ्यावी.
प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरोज जांभळे, अर्चना खोत, आदींनी मनोगत व्यक्त केले. गणेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला उपस्थितीत होत्या.
( फोटो ओळ = कसबा बीड (ता. करवीर) येथे उपप्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जिजामाता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे, शेजारी डॉ. विनिता जाधव, अर्चना खोत, सरोज जांभळे, आदी)