उद्योग क्षेत्रात महिला स्वतःच्या पायावर उभ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:24 AM2021-03-17T04:24:48+5:302021-03-17T04:24:48+5:30

उद्योजकतेचा मूलमंत्र - पुस्तकाचे प्रकाशन लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर - आजच्या धावपळीत महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. छोटे-मोठ्या ...

Women stand on their own feet in the field of industry | उद्योग क्षेत्रात महिला स्वतःच्या पायावर उभ्या

उद्योग क्षेत्रात महिला स्वतःच्या पायावर उभ्या

Next

उद्योजकतेचा मूलमंत्र - पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणानगर - आजच्या धावपळीत महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. छोटे-मोठ्या उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी महिला आता पुढे येत असून, ही गौरवास्पद बाब असल्याचे प्रतिपादन वारणा भगिनी मंडळाच्या समुपदेशक व नारी शक्ती मंचाच्या अध्यक्षा संध्या राजेंद्र पाटील (कोडोली ) यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या नारी शक्ती मंचच्या ‘उद्योजकतेचा मूलमंत्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा समुपदेशक संध्या पाटील यांच्या हस्ते पुण्यात शानदार समारंभात झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

वारणा माहिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा स्वर्गीय शोभा कोरे यांच्या प्रेरणेने संध्या पाटील या वारणा भगिनी मंडळाच्या समुपदेशक व नारीशक्ती मंचच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. यावेळी संध्या पाटील यांच्या ‘बोला मनातलं’ या उपक्रमाला पुण्यात महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, ‘दे आसरा’च्या प्रज्ञा देशपांडे, महिला व बालकल्याण समिती सभापती माधुरी सहस्त्रबुद्धे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

फोटो ओळ...पुणे येथे महिला व बालकल्याण समितीमार्फत सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या नारीशक्ती मंचच्या ‘उद्योजकतेचा मूलमंत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन वारणा भगिनी मंडळाच्या समुपदेशक व नारीशक्ती मंचाच्या अध्यक्षा संध्या पाटील (कोडोली) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदेशाध्याक्ष उमा खापरे, प्रज्ञा देशपांडे आदी उपस्थित होत्या.

Web Title: Women stand on their own feet in the field of industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.