पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर महिलांनी अडवला महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 02:21 PM2019-12-20T14:21:27+5:302019-12-20T14:36:37+5:30

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जातुन शासनाने महिलांना मुक्त करावे अन्यथा दहा दिवसांनी याच राष्ट्रीय महामार्गावर आत्मदहन करणार असा इशारा छत्रपती शासन कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्यावतीने देण्यात आला.पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पंचगंगा नदी शेजारी दर्गा समोर सुमारे तीस मिनिटे दोनशेहून अधिक महिलांनी महामार्ग अडवला.

Women stop on the Pune-Bangalore National Highway | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर महिलांनी अडवला महामार्ग

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर महिलांनी अडवला महामार्ग

Next
ठळक मुद्देपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर महिलांनी अडवला महामार्ग मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जातुन महिलांना मुक्त करा

शिरोली :मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जातुन शासनाने महिलांना मुक्त करावे अन्यथा दहा दिवसांनी याच राष्ट्रीय महामार्गावर आत्मदहन करणार असा इशारा छत्रपती शासन कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्यावतीने देण्यात आला.पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पंचगंगा नदी शेजारी दर्गा समोर सुमारे तीस मिनिटे दोनशेहून अधिक महिलांनी महामार्ग अडवला.

तसेच कोल्हापूर सांगली मार्गावर शिरोली सांगली फाटा टोल नाका येथे सुमारे दोन तास या महिला ठिय्या मारून बसल्या होत्या. यावर निवासी नायब तहसीलदार दिगंबर सानप यांनी मंगळवार (दि.२४)रोजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी कोल्हापूर येथे बैठक आयोजित केली आहे असे सांगितलेवर आंदोलन मागे घेतले. 

या आंदोलनात इचलकरंजी, शिरोळ, राजापूर, टाकळीवाडी,दतवाड,घोसरवाड,दानवाड, अकिवाट,तेरवाड,हेरवाड, येथील महिला दिव्याताई मगदूम,स्वाती माजगांवकर, मनीषा कुंभार, अर्चना माळगे,अल्मान तांबोळी, बिल्मिल्ला दानवाडेर,पुजा कांबळे, मयुरी जाधव,प्रियंका गस्ते,अश्वीनी कांबळे यांच्यासह महिला सहभागी होत्या.

Web Title: Women stop on the Pune-Bangalore National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.