Women's Day 2018 कोल्हापूर : पोलिस दलातर्फे महिलांचा गौरव, विविध उपक्रमांनी महिला दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 06:22 PM2018-03-08T18:22:00+5:302018-03-08T18:22:00+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर पोलिस दलातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या रुची राणा होत्या. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, रुपाली नांगरे पाटील, भारती मोहिते व निर्भया पथकाचे अधिकारी व वुई केअर संस्थेचे सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर : जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर पोलिस दलातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या रुची राणा होत्या. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, रुपाली नांगरे पाटील, भारती मोहिते व निर्भया पथकाचे अधिकारी व वुई केअर संस्थेचे सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, शाहूपुरी, कोडोली पोलीस ठाणे यांच्यातर्फे विविध उपक्रम घेऊन महिला दिन साजरा झाला.
यावेळी रुची राणा यांनी,दैनंदिन जीवनातील तणाव कसा कमी करायचा व कामाचे नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी स्वागत करुन उपस्थित महिलाना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी निर्भया पथकाच्या कामगिरीची महिती दिली.
जिल्ह्यातील कार्यरत निर्भया पथक आधिकारी व कर्मचारी यांच्या या आर्थिक वर्षाच्या चांगले कामगिरीसाठी सर्व निर्भया पथक अधिकारी व कर्मचारी यांचा विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ‘वुई केअर समोपदेशन संस्थांतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी आभार मानले.
दरम्यान, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी व कर्मचारी कामकाज पाहत होत्या. महावितरण कोल्हापूर कार्यालयातील महिलांनी आयोजित केलेल्या मोटारसायकल रॅलीचे शाहुपुरी पोलीस स्टेशन तर्फे स्वागत केले.रॅलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख यांच्यासह पोलिस महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
यावेळी देशमुख यांनी, महिलांशी संवाद साधून त्यांना पोलीस विभागाबाबत माहिती दिली व त्यांच्या शंकांचे निरसन केले.यावेळी पालीस ठाण्याच्या आवारात थंडपेयपानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यानंतर महिला मेळावा, आरोग्य शिबीर, स्नेहभोजन व भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम झाला.पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
त्याचबरोबर कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिलांची सन्मान रॅली काढण्यात आली.यामध्ये कोडोली हायस्कुल येथे हा कार्यक्रम झाला.यावेळी महिला पोलिसांच्या सत्कार करण्यात करुन महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह अधिकारी,कमृचारी उपस्थित होते.
रयत क्रांती संघटनेतर्फे सन्मान...
रयत क्रांती संघटना,कोल्हापूर यांच्यातर्फे पोलिस विभागात कार्यरत असणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष परेश भोसले, कार्याध्यक्ष भारत तोडकर, उपाध्यक्ष शरद नारकर, श्रीधर येसणे, करण तुपसौंदरे आदी उपस्थित होते.