तळसंदे डीवायपी कृषी विज्ञान केंद्रात महिला दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:27 AM2021-03-09T04:27:31+5:302021-03-09T04:27:31+5:30
नवे पारगाव : तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ ...
नवे पारगाव : तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित महिला मेळावा व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप अध्यक्षस्थानी होते.
बारामती येथील प्युअर ऑरगॅनिकच्या कार्यकारी अधिकारी स्वाती शिंगाडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे प्राचार्य डॉ. तुळशीदास बास्टेवाड, अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने, बँक ऑफ इंडिया कोल्हापूरच्या माधवी कदम, आयडीबीआय बँक कोल्हापूरचे सहायक व्यवस्थापक व बाळासाहेब झिंजाडे आदींची भाषणे झाली.
निबंध व पाककृती स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके दिली. मेळाव्यात १४३ महिलांनी सहभाग घेतला. डॉ. डी वाय पाटील कृषी महाविद्यालयचे प्राचार्य डी. एन. शेलार व प्रा.पी. डी. उके यांचे सहकार्य लाभले. प्रा.दीपाली मस्के यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.सुधीर सूर्यकांत यांनी आभार मानले.
फोटो ओळी :तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी विज्ञान केंद्र येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस देताना प्रमुख जयवंत जगताप. व्यासपीठावर बाळासाहेब झिंजाडे, राहुल माने, माधवी कदम उपस्थित होते.