पुणे विभागातील महिला मेळावा आक्टोबरमध्ये कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:47 PM2017-08-29T18:47:07+5:302017-08-29T18:56:51+5:30
कोल्हापूर : पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील महिलांचा मेळावा आॅक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात कोल्हापूरमध्ये घेण्यात येणार आहे.
कोल्हापूर : पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील महिलांचा मेळावा आॅक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात कोल्हापूरमध्ये घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाºया या मेळाव्याच्या प्राथमिक तयारीसाठी उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुड्डेवार यांनी कोल्हापूरला सोमवारी भेट दिली. यावेळी गुड्डेवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शहरातील विविध मैदानांची पाहणी केली.
शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी पुणे विभागाचा हा मेळावा कोल्हापूरमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसे पत्रही ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून गुड्डेवार हे सोमवारी सकाळी कोल्हापुरात आले. त्यांनी डॉ. खेमनार यांच्यासमवेत शिवाजी स्टेडियम, शाहू स्टेडियम, मेरी वेदर मैदान, तपोवन, पोलीस मैदान या मैदानांची पाहणी केली.
या महिला मेळाव्याच्या निमित्ताने पाच जिल्ह्यांतील महिला बचत गटांचेही प्रदर्शन घेण्यात येणार असल्याने त्याहीदृष्टीने नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. एक दिवसाचा महिला मेळावा आणि उर्वरित सहा दिवस बचत गट उत्पादनांचे प्रदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप राहणार आहे. मोठ्या संख्येने येणाºया महिलांच्या निवासाची व्यवस्था, त्यांच्यासाठीचे विविध कार्यक्रम याबाबतचे नियोजन सुरू झाले असून, हा मेळावा यशस्वी करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
पाचही जिल्ह्यांतील शेकडो महिला बचत गटांना या ठिकाणी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पाचही जिल्ह्यांतील महत्त्वाची उत्पादने यावेळी कोल्हापूरकरांना उपलब्ध होणार असून, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास, महिला व बालविकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणाºया या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी लवकरच व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.