‘शब्दांचे वॉर’ शुक्रवारी
By admin | Published: February 10, 2015 11:22 PM2015-02-10T23:22:03+5:302015-02-10T23:51:57+5:30
‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे ‘वॉर आॅफ दि वर्डस’
कोल्हापूर : युवा पिढीसमोर आव्हाने अनेक आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठीची उपलब्ध साधनेही तितकीच. जगाशी तुमची नाळ जोडणारे आणि काही वेळा वादग्रस्त ठरणारे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. या माध्यमावर कुणी टीका करील, तर कोणी समर्थन. म्हणूनच तरुणाईच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे शुक्रवारी (दि. १३) या विषयावर ‘वॉर आॅफ दि वर्डस’ या डीबेट स्पर्धा आयोजित केली आहे.
कदमवाडीतील ‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट’ या महाविद्यालयात दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. यात विद्यार्थ्यांनी सोशल नेटवर्किंग आयुष्याचा अविभाज्य घटक बनत चालला आहे का? या विषयावर आपली मते मांडायची आहेत. या स्पर्धेला नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीस यांचे प्रायोजकत्व व भारती विद्यापीठ शिक्षण संस्थेचे सहकार्य लाभले आहे.
या स्पर्धेत ‘युवा नेक्स्ट’च्या सदस्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे; तर अन्य विद्यार्थ्यांना ३० रुपये प्रवेश फी भरावी लागेल. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रुपये पंधराशे, एक हजार व पाचशे रुपये रोख बक्षीस व सन्मानचिन्ह दिले जाईल. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा व अधिक माहितीसाठी सचिन : ९७६७२६४८८५ व ०२३१-२६४१७०७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीस ही संस्था गेली १४ वर्षे राजारामपुरी येथे कार्यरत असून, येथे नामवंत कंपन्यांचे
सर्टिफि केट कोर्सेस शिकविले जातात. या संस्थेतून २० हजारांहून अधिक विद्यार्थी शिकून नामवंत कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम करीत आहेत. ‘व्हीयुई’ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे परीक्षा केंद्रही येथे आहे.
लकी ड्रॉ काढणार
या कार्यक्रमात संध्याकाळी साडेसहा वाजता ‘युवा नेक्स्ट २०१४-१५’ या वर्षातील सदस्यता नोंदणीचे लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. यात विजेत्या विद्यार्थ्यांना पार्थ आॅप्टिक्सतर्फे गॉगल्स, साई स्पोर्टस्तर्फे ट्रॅकसुट व बॉक्स आॅफिस रेंट अॅँड सेलच्यावतीने गिफ्ट व्हाउचर्स देण्यात येणार आहेत.