पन्हाळ्यातील पर्यायी रस्त्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:46+5:302021-08-26T04:25:46+5:30

अतिवृष्टीने भूस्खलन झाल्याने पन्हाळ्याचा मुख्य रस्ता २३ जुलै रोजी सकाळी खचला. सर्व पन्हाळ्याचे व्यव्हार ठप्प झाले. सलग तिसऱ्या वर्षी ...

Work on an alternative road to Panhala continues | पन्हाळ्यातील पर्यायी रस्त्याचे काम सुरू

पन्हाळ्यातील पर्यायी रस्त्याचे काम सुरू

googlenewsNext

अतिवृष्टीने भूस्खलन झाल्याने पन्हाळ्याचा मुख्य रस्ता २३ जुलै रोजी सकाळी खचला. सर्व पन्हाळ्याचे व्यव्हार ठप्प झाले. सलग तिसऱ्या वर्षी पन्हाळा बंद राहिल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. २०१९ ला मुख्य रस्ता अतिवृष्टीने खचल्याने पन्हाळ्याला येण्यासाठी पर्यायी रस्त्याची गरज निर्माण झाली होती. हा होणारा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने परवाना मिळणे मुश्कील झाले होते. तथापि, पन्हाळा नागरिकांचा रेटा आणी पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य यामुळे वनविभागाने पर्यायी रस्त्यासाठी आपल्या हद्दीतून परवाना दिला. यासाठी लागणारा निधी २० लाख रुपये दिला आहे. यासाठी ‘लोकमत’ने वेळोवेळी बातमी देऊन पाठपुरावा केल्याने याला यश आले. हा पर्यायी रस्ता येत्या दहा दिवसांत खुला करण्याचा प्रयत्न राहील, असे नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्य रस्त्यासाठी पाच कोटींची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केली आहे. याबाबत कार्यकारी अभियंता सी. ए. ऐरेकर यांनी सांगितले की, ही निविदा काढण्यापूर्वी ऑनलाईन निविदा पुण्याच्या टेंसर कंपनीने भरली होती. ती ५.५० कोटींची असल्याने रद्द केली गेली. आताच्या निविदेप्रमाणे हे रस्त्याचे काम चालू होण्यास एक महिना जाणार असून, रोज अर्धा मीटरप्रमाणे काम होणार असून, काम संपण्यास किमान तीन महिने लागतील. विशेष तंत्रज्ञान वापरून हे काम केले जाणार आहे. अजूनही दिल्ली भूगर्भ शास्त्रज्ञांचे अहवाल येणे बाकी आहे.

फोटो

Web Title: Work on an alternative road to Panhala continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.