राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:15+5:302021-04-29T04:18:15+5:30

तालुक्यातील राजापूर बंधारा हा नेहमीच वरदान ठरला आहे. या बंधाऱ्यामुळे शेतीसह पिण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असते. दरवर्षी ...

Work begins on laying barges on Rajapur embankment | राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्याचे काम सुरू

राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्याचे काम सुरू

Next

तालुक्यातील राजापूर बंधारा हा नेहमीच वरदान ठरला आहे. या बंधाऱ्यामुळे शेतीसह पिण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असते. दरवर्षी या बंधाऱ्यावर उन्हाळ्यामध्ये बरगे घातले जातात. कर्नाटकातील हिप्परगी धरणाच्या बॅकवॉटरमुळे एप्रिलअखेर राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्याची आवश्यकता भासली नाही. दरम्यान, राजापूर बंधाऱ्यावर कृष्णेची पाणीपातळी आठ फुटांवर आल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी पाटबंधारे विभागाने नियोजन सुरू केले आहे. बंधाऱ्यावर बरगे घालण्यापूर्वी तटलेले लाकडी ओंडके जेसीबीच्या साहाय्याने काढण्याचे काम सुरू झाले आहे. स्वच्छता करून बरगे घातले जात आहेत. पाणीपातळी वाढविण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजनही करण्यात आले.

फोटो - २८०४२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळी - शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्याचे काम सुरू झाले आहे.

Web Title: Work begins on laying barges on Rajapur embankment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.