म्हासुर्लीतील आरोग्य केंद्र इमारतीचे काम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:12+5:302021-09-02T04:50:12+5:30
धामणी खोऱ्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असलेल्या म्हासुर्ली येथे गेल्या कित्येक दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होत होती. आ ...
धामणी खोऱ्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असलेल्या म्हासुर्ली येथे गेल्या कित्येक दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होत होती. आ प्रकाश आबिटकर यांनी या मागणीचा विचार करून सुमारे चार कोटी रुपये खर्चाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी आणून गतवर्षी इमारतीचे भूमिपूजन केले. कोल्हापूर येथील पॅराडाईस बिल्डर अँड डेव्हलपर यांना बांधकामाचा ठेका दिला असून कामाच्या सुरुवातीपासून कोरोनामुळे मजूर टंचाई जाणवल्याने काम थोडे संथ गतीने सुरू होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून संबंधित ठेकेदाराने मजूर संख्या वाढविली असून, कामाची गती वाढली आहे. सध्या तळमजल्यासह वरील दुसऱ्या मजल्याचे बांधकाम वेगाने सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात सुसज्ज अशी इमारत पूर्ण होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार आहे.
प्रतिक्रिया
गतवर्षीपासून काम सुरू असून, धोरणामुळे मजूर टंचाई जाणवली, त्यामुळे कामाची गती थोडी संथ होती; पण येत्या दोन महिन्यात पूर्ण क्षमतेने काम करून काम पूर्ण करणार आहे.
राजू मुळीक, बांधकाम ठेकेदार.