चोरडिया ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:26 AM2021-03-16T04:26:44+5:302021-03-16T04:26:44+5:30
जयसिंगपूर : गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण असो, आरोग्यविषयक समस्या, प्रत्येकवेळी चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट मदतीसाठी धावून जातो. सामाजिक बांधिलकीतून श्रावणबाळ विकलांग ...
जयसिंगपूर : गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण असो, आरोग्यविषयक समस्या, प्रत्येकवेळी चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट मदतीसाठी धावून जातो. सामाजिक बांधिलकीतून श्रावणबाळ विकलांग संस्थेला केलेली मदत कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
येथील स्व. मोतिलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने श्रावणबाळ विकलांग वसतिगृह या संस्थेतील दिव्यांग मुलांसाठी राज्यमंत्री यड्रावकर यांच्या उपस्थितीत व्हॅन प्रदान करण्यात आली. स्वागत करून विनोद चोरडिया म्हणाले, गेल्या २१ वर्षांपासून ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातात. दिव्यांग मुलांची अडचण समजून घेऊन त्यांना गाडी प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी उद्योगपती विनोद घोडावत, राजेंद्र नांद्रेकर, राजेश चोरडिया, प्रवेश चोरडिया, अंकित चोरडिया, प्रसन्न लुनिया, संजय बलदवा, दीपक बियाणी, अजित कोले, प्रदीप भुरसुट्टे, प्रकाश चौगुले, राजेंद्र झेले, सतीश जांगडे उपस्थित होते.
फोटो - १५०३२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील मोतिलाल चोरडिया ट्रस्टच्यावतीने श्रावणबाळ विकलांग संस्थेला व्हॅन प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनोद चोरडिया, विनोद घोडावत, राजेंद्र नांद्रेकर, राजेश चोरडिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.