काँग्रेसच्या सत्तेसाठी कामाला लागा
By admin | Published: September 12, 2016 12:58 AM2016-09-12T00:58:24+5:302016-09-12T00:58:24+5:30
प्रकाश आवाडे : पक्ष मानणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची मुभा
इचलकरंजी : कोणत्याही संकटाला तोंड देण्यास काँग्रेस पक्ष समर्थ आहे. कोणी कोणाची शिफारस करण्याची गरज नसून झालं गेलं गंगेला मिळालं असे समजून चुकलेल्यांना माफ करूया. पक्ष मानणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची मुभा आहे; परंतु एका घरात एकच उमेदवारी दिली जाईल आणि त्याचबरोबर अर्ज करणाऱ्याचाच विचार केला जाईल. आरक्षण कोणतेही असो त्याची तमा न करता नगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसचा तिरंगा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी इच्छुकांना अर्ज वाटपाचा प्रारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे होते.
आवाडे पुढे म्हणाले, मागचा इतिहास उगाळत कोण काय केलं याचा पंचनामा करण्यापेक्षा चुकलेल्यांना व पक्ष कार्याची तयारी असलेल्यांना सोबत घेऊया. काँग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या माध्यमातून विकासगंगा आणली, पण अलीकडच्या काळात गोरगरिबांच्या हक्कावर गदा आणून राज्य शासनाच्या माध्यमातून पोकळ घोषणाबाजी करीत शुद्ध फसवेगिरी केली जात आहे. जनतेला आता चटके जाणवू लागले असून ती योग्यवेळी उत्तर देईल.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, शहरात पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत चढ-उतार हे असणारच, पण सत्ता नाही म्हणून शांत बसू नका. माफीची दानत ही केवळ काँग्रेसकडेच आहे. अन्य पक्ष केवळ बैठका आणि पोकळ घोषणा करून बोलबाला करीत आहेत. पक्षासह शहराचे अस्तित्व टिकविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले.
यावेळी इंटकचे सरचिटणीस शामराव कुलकर्णी, राहुल खंजिरे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रकाशराव सातपुते, सतीश डाळ्या, विलास गाताडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, धोंडीलाल शिरगावे, मुकुंद पोवार, रमेश कबाडे, राहुल आवाडे, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत इंगवले, शशांक बावचकर, अब्राहम आवळे, रवी रजपुते, दिलीप झोळ, रणजित जाधव, श्रीरंग खवरे, के. के. कांबळे, अंजली बावणे, मीनाक्षी माळी, आशादेवी लायकर, नंदाताई साळुंखे, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.