कोरोना काळातील काम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:31+5:302021-06-16T04:32:31+5:30

वाघापूर : कोरोना काळातील काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पं. स. नूतन सभापती आक्काताई नलवडे यांनी केले. आदमापूर (ता. ...

The work of the Corona period is admirable | कोरोना काळातील काम कौतुकास्पद

कोरोना काळातील काम कौतुकास्पद

Next

वाघापूर : कोरोना काळातील काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पं. स. नूतन सभापती आक्काताई नलवडे यांनी केले.

आदमापूर (ता. भुदरगड) येथे कोरोनाकाळात उत्कृष्ट सेवा बजावलेल्या आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना देण्यात आलेल्या कोरोना योद्धा सन्मानप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते सभापती आक्काताई नलवडे यांचा सत्कार करण्यात आला.

त्या पुढे म्हणाल्या, ‘आदमापूर गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊ, तसेच गावातील उर्वरित कामे करण्यास प्राधान्याने लक्ष दिले जाईल.’

सरपंच विजयराव गुरव म्हणाले, ‘गावातील युवा स्पोर्टस् व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाकाळात आरोग्यसेवा चांगल्या पद्धतीने देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सध्या अनेक नवनवीन योजना सुरू आहेत. घंटागाडी, सौरऊर्जा ही कामेही लवकरात लवकर मार्गी लावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी बिद्री कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगले, बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सरपंच विजयराव गुरव, उपसरपंच राजनंदिनी भोसले, ग्रामपंचायत सदस्य शरद निंबाळकर, बी. एस. खापरे, डाॅ. सागर नाईक, अभिजित देसाई, दिलीप पाटील, तलाठी तानाजी पाटील, पोलीस पाटील लक्ष्मण पाटील, ज्ञानदेव पाटील, विठ्ठल पाटील, युवा स्पोर्टस्चे पदाधिकारी, बाजीराव जठार आदी उपस्थित होते.

आभार सचिन पाटील यांनी मानले.

फोटो ओळी:

आदमापूर (ता. भुदरगड)येथे कोरोना योद्धा सन्मानप्रसंगी बोलताना नूतन सभापती आक्काताई नलवडे, शेजारी सरपंच विजयराव गुरव, उपसरपंच राजनंदिनी भोसले आदी.

(छायाचित्रे : बाजीराव जठार, वाघापूर)

Web Title: The work of the Corona period is admirable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.