कोरोना काळात उद्योजकांचे कार्य कौतुकास्पद : अशोकराव माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:41+5:302021-09-27T04:26:41+5:30

शिरोळ : कोरोनाच्या परिस्थितीतही उद्योजकांनी चांगले काम केले आहे. नवीन योजनांची अंमलबजावणी करून क्लस्टर योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे कार्य करत ...

The work of entrepreneurs during the Corona period is admirable: Ashokrao Mane | कोरोना काळात उद्योजकांचे कार्य कौतुकास्पद : अशोकराव माने

कोरोना काळात उद्योजकांचे कार्य कौतुकास्पद : अशोकराव माने

googlenewsNext

शिरोळ : कोरोनाच्या परिस्थितीतही उद्योजकांनी चांगले काम केले आहे. नवीन योजनांची अंमलबजावणी करून क्लस्टर योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे कार्य करत राहू. कामगारांसाठी व उद्योजकांसाठी ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करू. उद्योजकांना थेट नदीचे पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा योजना काम पूर्णत्वाकडे नेऊ, असे प्रतिपादन शाहू औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले.

मौजे आगर येथे छत्रपती शाहू को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेटची ३६ वी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी संस्थेच्या २०२०-२१ च्या कामाचा आढावा घेण्यात आला. अध्यक्ष माने म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीत उद्योजकांनी चांगले काम केले आहे. नवउद्योजकांना सोबत घेऊन संस्थेने हजारो बेरोजगारांना काम दिले. संस्थेत एकाच छताखाली सर्व उत्पादितांचे टेस्टिंग व्हावे, कामगारांसाठी टेस्टिंग सेंटर व क्लस्टर योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे कार्य करत राहू. एकमेकांच्या सहकार्याने शाहू औद्योगिक वसाहतीची प्रगती साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेचे नोटीस वाचन सुरेंद्र तिवडे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश रेडेकर, संचालक नीलेश शिंदे, डॉ. अरविंद माने, अविनाश टारे, मनोज मगदूम, दयानंद जाधव, संजय पाटील, सागर कोळी, ओमकार माने, संतोष माने, शंकर माने, सुहास राजमाने उपस्थित होते.

फोटो - २६०९२०२१-जेएवाय-०८

फोटो ओळ - मौजे आगर (ता. शिरोळ) येथील शाहू औद्योगिक संस्थेच्या सभेत अध्यक्ष डॉ. अशोकराव माने यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: The work of entrepreneurs during the Corona period is admirable: Ashokrao Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.