गंगावेश-शिवाजी पूल ड्रेनेजलाइनचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:42+5:302021-02-10T04:24:42+5:30

कोल्हापूर : गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याचे काम बरेच वर्षे रखडले होते. या कामाच्या पूर्ततेसाठी आखरी रास्ता कृती समिती ...

Work on Gangavesh-Shivaji bridge drainage line started | गंगावेश-शिवाजी पूल ड्रेनेजलाइनचे काम सुरू

गंगावेश-शिवाजी पूल ड्रेनेजलाइनचे काम सुरू

googlenewsNext

कोल्हापूर : गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याचे काम बरेच वर्षे रखडले होते. या कामाच्या पूर्ततेसाठी आखरी रास्ता कृती समिती गेली अडीच वर्षे आंदोलन करत आहे. गेल्या आठवड्यात कृती समितीने येथील काम सुरू करण्यासाठी अखेरचा इशारा दिला होता. याची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेत रखडलेली ड्रेनेज व पाइपलाइनचे काम सुरू केले. आखरी रास्ता मित्रमंडळाच्या समोर ज्येष्ठ नागरिक भगवान बावडेकर यांच्या हस्ते कामाला सुरुवात केली. कृती समितीचे किशोर घाटगे यांनी काँक्रीट रस्त्याचा शासनाकडे जो प्रस्ताव आहे. त्याला त्वरित मंजुरी घ्यावी, असे सांगितले. राकेश पाटील, प्रकाश गवंडी, सुरेश कदम, रियाज बागवान, दिनेश ओतारी आदी उपस्थित होते.

फोटो : ०९०२२०२१ काेल आखरी रास्ता न्यूज

ओळी : कोल्हापुरातील गंगावेश ते शिवाजी पूल येथील रखडलेले ड्रेनेजलाइनच्या कामाला सुरुवात झाली.

Web Title: Work on Gangavesh-Shivaji bridge drainage line started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.