कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:33+5:302021-06-09T04:29:33+5:30
कणेरी : आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, मदतनीस सेविका ,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेले कार्य ...
कणेरी : आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, मदतनीस सेविका ,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले.
कणेरी येथील आमदार ऋतुराज पाटील फाउंडेशन, सतेज पाटील विचार मंच यांच्यावतीने कोरोना काळात फ्रंट लाईनला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वाफेचे मशिन देऊन पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी जि. प. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकूळचे नूतन संचालक प्रकाश पाटील, सरपंच उज्ज्वला शिंदे, उपसरपंच उज्ज्वला पाटील, एम. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एम. बी. पाटील यांनी आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ई.सी.जी. मशिन दिले. ते आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी मस्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कणेरीचे प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांनी जागतिक स्तरावरील नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो
: ८ कणेरी सत्कार
कणेरी येथे आमदार ऋतुराज पाटील फाउंडेशन, सतेज पाटील विचार मंच यांच्यावतीने कोरोनाच्या काळात फ्रंट लाईनला काम करणाऱ्या आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडीतील सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांना वाफेचे मशिन देऊन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.