शिवाजी विद्यापीठाचेही आजपासून वर्क फ्रॉम होम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:23 AM2021-05-16T04:23:11+5:302021-05-16T04:23:11+5:30
कोल्हापूर : उद्यान, आरोग्य, सुरक्षा, वाहनासह अभियांत्रिकी विभागातंर्गत येणारे विभाग वगळून शिवाजी विद्यापीठ व त्याच्या अंतर्गत येणारी महाविद्यालये ...
कोल्हापूर : उद्यान, आरोग्य, सुरक्षा, वाहनासह अभियांत्रिकी विभागातंर्गत येणारे विभाग वगळून शिवाजी विद्यापीठ व त्याच्या अंतर्गत येणारी महाविद्यालये आजपासून आठ दिवस पूर्णपणे बंद राहणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होमसह ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. इंटरनेट, दूरध्वनी, मोबाईल सेवा व शेतीशी निगडित कामे सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे.
आजपासून २३ तारखेपर्यंत कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांच्या कडक नियमावलीचे पालन शिवाजी विद्यापीठही करणार असल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. २३ मे च्या रात्री १२ पर्यंत हे निर्बंध असणार आहेत.
विद्यापीठ अधिविभाग व विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील शिक्षकांनी ऑनलाईन अध्यापन, अध्ययन सुरू राहणार असून, वर्क फ्रॉम होमचा अहवाल विद्यापीठ कार्यालयास पाठविणे बंधनकारक आहे. सांगली व सातारा जिल्ह्यांतील महाविद्यालयांनीदेखील अत्यावश्यक सेवा वगळून उर्वरित कार्यालये व कामकाज बंद ठेवायचे आहेत. सर्वांनीच ऑनलाईन कामकाजाला प्राधान्य द्यायचे आहे.
सध्या विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. लॉकडाऊन काळात त्या नियोजित वेळापत्रकानुसार सुरूच राहणार आहे. मात्र, त्यांची कार्यालये मात्र १५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.