माणुसकी फाउंडेशन व पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:34+5:302021-06-21T04:17:34+5:30
फूड बॅँक संकल्पना राबविणार लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : माणुसकी फाउंडेशन व पोलीस दलाने कोरोना काळात गरजूंना मोफत भोजन ...
फूड बॅँक संकल्पना राबविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : माणुसकी फाउंडेशन व पोलीस दलाने कोरोना काळात गरजूंना मोफत भोजन देऊन त्यांना आधार दिला आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असून, शहरासह पंचक्रोशीत कोणीही उपाशी राहणार नाही. यासाठी फूड बॅँक ही संकल्पना राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी केली.
माणुसकी फाउंडेशन व पोलीस दलाने पुढाकार घेवून गरजूंना मोफत भोजन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हजारो कुटुंबांना जेवण पोहच केले जात आहे. या कार्याच्या रिक्रिएशन येथील सेंट्रल किचनला आवाडे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी माणुसकी फाउंडेशन कार्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. यावेळी जि. प. सदस्य राहुल आवाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे विकास जाधव, रवींद्र जावळे, वैशाली कदम आदींसह पोलीस बॉइज व माणुसकी फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.