जमाअत ए इस्लामी हिंद संघटनेचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:57+5:302021-03-15T04:22:57+5:30
शिरोळ : सन २०१९ च्या प्रलयकारी महापुरात तालुक्यामधील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले. कनवाड येथे इतर नुकसानीबरोबरच अनेकांची घरे ...
शिरोळ : सन २०१९ च्या प्रलयकारी महापुरात तालुक्यामधील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले. कनवाड येथे इतर नुकसानीबरोबरच अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. अशा गरीब घटकांना जमाअत-ए इस्लामी हिंद या सेवाभावी संस्थेकडून जवळपास दीड कोटी रुपये खर्चून ३४ पक्की घरे बांधून दिली. त्याचबरोबर दोन शाळांना कंपाउंड बांधून दिले हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
बांधलेल्या घरांचा दर्जा अतिशय उत्तम असल्याचे सांगताना संस्थेच्या वतीने कनवाड हे गाव दत्तक घ्यावे. शासन आपल्यासोबत हातात हात घालून काम करेल असेही मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
कनवाड (ता. शिरोळ) येथे पूरग्रस्तांसाठीच्या घरांचा लोकार्पण कार्यक्रम मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते रविवारी पार पडला. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गटविकास अधिकारी शंकर कवितके उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जमाअत-ए-इस्लामी हिंद या संस्थेचे राज्याध्यक्ष रिजवानुरहमान खान होते.
याप्रसंगी सरपंच बाबासो आरसगोंडा, अखिलआली इनामदार, मोहम्मद जफर अन्सारी, मुअज्जम नाईक, सलमान खान, मोहम्मद फारुख, नदीम सिद्धीकी, अन्वर पठाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १४०३२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - कनवाड (ता. शिरोळ) येथे जमाअत-ए इस्लामी हिंद संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना घरांचे लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिजवानुरहमान खान, अखिलआली इनामदार, बाबासो आरसगोंडा, संजयसिंह चव्हाण, शंकर कवितके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.