कोल्हापूर जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:29 AM2021-09-05T04:29:00+5:302021-09-05T04:29:00+5:30
कोपार्डे : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला असून, राज्यात सर्वप्रथम पीक कर्जाच्या व्याजाचे दर ...
कोपार्डे : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला असून, राज्यात सर्वप्रथम पीक कर्जाच्या व्याजाचे दर कमी करून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ निर्माण करणाऱ्या जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी काढले. कोपार्डे (ता. करवीर) येथील हनुमान विकास सेवा संस्थेत जिल्हा बँकेची मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती रसिका पाटील, करवीर पंचायत समिती उपाध्यक्ष अविनाश पाटील, विठ्ठल पाटील उपस्थित होते. राहुल पाटील म्हणाले, राष्ट्रीयीकृत बँकेबरोबर व्यावसायिक स्पर्धा करताना ग्राहक व शेतकऱ्यांना आता आपल्या गावातच पैसे मिळण्याची सोय झाली आहे. यामुळे वेळेची बचत व सुरक्षितता मिळणार असून सेवासंस्थांनी आपल्या सभासद व ग्रामस्थांना त्याचा लाभ प्रभावीपणे द्यावा, असे सांगितले. या वेळी सरपंच शारदा पाटील, उपसरपंच सरदार जामदार, नामदेव पाटील, संचालक ए. डी. पाटील, एस. के. पाटील, सर्जेराव पाटील, कृष्णात पाटील, पांडुरंग पाटील उपस्थित होते.
040921\img-20210904-wa0066.jpg
फोटो -- जिल्हा बँकेच्या वतीने कोपार्डे (ता. करवीर) मायक्रो एटीएमची सुविधा उद्घाटन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, शिक्षण सभापती रसिका पाटील करवीर पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील विठ्ठल पाटील