कोल्हापूर जिल्ह्याचे काम राज्यात आदर्श

By admin | Published: October 13, 2016 01:39 AM2016-10-13T01:39:00+5:302016-10-13T02:07:28+5:30

स्वाधीन क्षत्रिय : ई-जमाबंदीचा प्रयोग यशस्वी करण्याचे आवाहन; विविध समस्या सोडविण्याची ग्वाही

The work of Kolhapur district is ideal in the state | कोल्हापूर जिल्ह्याचे काम राज्यात आदर्श

कोल्हापूर जिल्ह्याचे काम राज्यात आदर्श

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे काम सर्वच पातळ््यांवर राज्यात आदर्श आहे. जिल्ह्यातील पर्यटन, विमानतळ, आरोग्य विभागांतील रिक्त पदे आदी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असा विश्वास राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिला तसेच ई-डिस्नीक प्रणाली कोल्हापूर जिल्ह्याने यशस्वी केली असून आता यापुढे जाऊन ई-जमाबंदी प्रयोगही यशस्वी करावा, असे सांगून २६ जानेवारीपर्यंत कोल्हापूर जिल्हा १०० टक्के हागणदारीमुक्त व्हावा, यासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी आयोजित बैठकीत ते बोलत
होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शाहू स्मारक हे ‘टुरिस्ट हब’म्हणून विकसित करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)


कोल्हापूरचा गौरव
कोल्हापूर जिल्ह्याने अनेक योजना सुरू केल्या आणि त्यानंतर राज्यात राबविल्या गेल्या, या भाषेत क्षत्रिय यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव केला. ई-डिस्नीक, तलाठ्यांना लॅपटॉप देण्याचा उपक्रम, स्वच्छता अभियान, आरोग्य विभागाच्या कायापालट योजनेचा त्यांनी उल्लेख केला. जिल्हा परिषदेने तसेच महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. ‘सेफ सिटी’सह अन्य विभागांचाही आढावा
त्यांनी यावेळी घेतला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचेही कौतुक
केले.

जुने दस्ताऐवज सांभाळा
यावेळी क्षत्रिय यांनी रेकॉर्ड रूमची पाहणी करून जुन्या ब्रिटिशकालीन नोंदी अतिशय चोख असून त्या नीट सांभाळा, अशा सूचना दिल्या. जुने कागद हातात घेतले की फाटतात तेव्हा त्याचे नीट स्कॅनिंग करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

प्रांताधिकारी लकी आहेत
कोणताही बडेजाव न बाळगता क्षत्रिय यांनी नवी सर्व इमारत फिरून पाहिली. दुसऱ्या मजल्यावरील करवीरचे प्रांत सचिन इथापे यांचे दालन पाहिल्यानंतर त्यांनी कुठे आहेत प्रांत, अशी विचारणा करून तुम्हाला चांगलं आॅफिस मिळालं, तुम्ही लकी आहात, अशी टिप्पणी केली. यावेळी त्यांनी इमारतीच्या दगडापासून कार्यालयातील टेबल-खुर्च्यांबाबतही सूचना केली. आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांनी त्यांना
माहिती दिली. जिल्हा खनिकर्म अधिकारी अभय भोगे यांच्याकडून क्षत्रिय यांनी जिल्ह्यातील सर्व खनिजांची माहिती
घेतली.

Web Title: The work of Kolhapur district is ideal in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.