मिरज-अर्जुनवाड पुलाचे काम आजपासून सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:22+5:302021-07-10T04:18:22+5:30
अर्जुनवाड : मिरज-अर्जुनवाड या मार्गावरील कृष्णा नदीवरील कृष्णाघाट-मिरज ते अर्जुनवाड येथील पुलाच्या सुरक्षिततेसाठी बेअरिंग बदलण्याचे काम आज, शनिवारपासून सुरू ...
अर्जुनवाड : मिरज-अर्जुनवाड या मार्गावरील कृष्णा नदीवरील कृष्णाघाट-मिरज ते अर्जुनवाड येथील पुलाच्या सुरक्षिततेसाठी बेअरिंग बदलण्याचे काम आज, शनिवारपासून सुरू होणार आहे. आज १० जुलै ते २० जुलैपर्यंत सकाळी ११ ते ११.३० या वेळेत दररोज कृष्णा घाट पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत पुलाच्या दुतर्फा बॅरिकेटस लावून काम केले जाणार आहे.
कृष्णा नदीघाटावरील पुल हा सन १९९४ मध्ये बांधलेला असून या पुलास ३० मीटर सात गाळे आहेत. गाळ्यांची एकूण लांबी २१० मीटर इतकी असून पुलाच्या सुरक्षिततेसाठी त्याचे बेअरिंग बदलणे, एक्सपेंशन जॉईंट बदलणे, रेलिंग दुरुस्ती करणे आदी कामे प्रस्तावित असून यापैकी प्राधान्याने पुलाचे बेअरिंग दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. प्रतिदिन एका गाळ्यातील बेअरिंग बदलण्याचे नियोजन असून त्यासाठी किमान ३० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे आज शनिवारपासून या मार्गावरील वाहतूक ३० मिनिटे बंद राहणार आहे, असे आवाहन सांगली जिल्हाधिकारी उपचिटणीस शाखा यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
फोटो - ०९०७२०२१-जेएवाय-०९
फोटो ओळ - अर्जुनवाड-मिरजदरम्यान असलेला कृष्णा नदीवरील पूल.