पुरवठा कर्मचाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन तिसºया दिवशीही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:39 PM2017-10-05T17:39:08+5:302017-10-05T17:41:14+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळ सेवा परीक्षेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. त्याच्या निषेधार्थ सुरू असलेले पुरवठा विभागातील कर्मचाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन गुरुवारी तिसºया दिवशीही सुरू राहिले.
राज्य शासनाने दिलेल्या या आदेशाला स्थगिती मिळावी, असे दि. १९ जून २०१७ व दि. ६ सप्टेंबरला संघटनेने निवेदन दिले होते. याबाबत राज्य संघटनेची महसूल मंत्र्यांबाबत चर्चा होऊनही शासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे मंगळवारपासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
गुरुवारी तिसºया दिवशीही पुरवठा विभागातील कर्मचारी आपापल्या कार्यालयांत जाऊन कार्यालयीन वेळेत थांबून होते. या कालावधीत त्यांनी कोणतेही कामकाज केले नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, शहर पुरवठा कार्यालयासह बारा तालुक्यांच्या पुरवठा कार्यालयातील सुमारे १६८ कर्मचारी बंदमध्ये सहभागी आहेत.