मुगळीच्या वाचनालयाचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:27+5:302021-02-15T04:21:27+5:30
गडहिंग्लज : ग्रामीण भागातील वाचनालय असूनदेखील मुगळीतील वाचनालयाने राबविलेले उपक्रम आदर्शवत आहेत. त्यामुळे खऱ्याअर्थाने 'इतर ब वर्ग दर्जा'मधून 'इतर ...
गडहिंग्लज : ग्रामीण भागातील वाचनालय असूनदेखील मुगळीतील वाचनालयाने राबविलेले उपक्रम आदर्शवत आहेत. त्यामुळे खऱ्याअर्थाने 'इतर ब वर्ग दर्जा'मधून 'इतर अ वर्ग दर्जा' देण्यास हे वाचनालय पात्र आहे, या शब्दांत पुणे विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी मुगळी वाचनालयाचे कौतुक केले. मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील म. गांधी सार्वजनिक मोफत वाचनालयास क्षीरसागर यांनी भेट देऊन ग्रंथालय कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्षीरसागर म्हणाले, सुसज्ज इमारत, शाळा, दत्तक योजना, आदर्श विद्यार्थ्यांना मोफत सभासद व वाचकांचा सत्कार यासारखे उपक्रम राबवून ग्रंथालयाने आपला गुणात्मक दर्जा वाढवला आहे. गेली २५ वर्षे वाचन वृद्धीसाठी ग्रंथालयातर्फे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. समाजाला या ग्रंथालयाचा हेवा वाटेल, असे कार्य करा. यावेळी सुभाष देसाई, प्रकाश इंगळे, दशरथ राऊत, सुरेश पाटील, विजय महाडिक, बी. जी. स्वामी, आप्पासाहेब जाधव, ईश्वर हुल्लोळी, आप्पासाहेब कदम, शंकर माने, सागर आरबोळे, गजानन कांबळे, राजेंद्र मांग यांच्यासह वाचक, सभासद उपस्थित होते.
फोटो ओळी : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील म. गांधी वाचनालयास पुणे विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी भेट दिली. यावेळी के. डी. धनवडे, श्रीपाद स्वामी, आप्पासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
क्रमांक : १४०२२०२१-गड-०३