राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:37+5:302021-08-26T04:26:37+5:30

कसबा बावडा : शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाकडून सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे. ...

The work of the National Service Plan is inspiring | राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य प्रेरणादायी

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य प्रेरणादायी

Next

कसबा बावडा : शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाकडून सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांना डी. वाय. पाटील ग्रुपचे नेहमीच पाठबळ राहील, अशी ग्वाही ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठ एन.एस.एस. विभागाचा वार्षिक आढावा व नियोजन बैठक कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे नुकतीच झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक अभय जयभाये हे होते. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले की, शिवाजी विद्यापीठच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य उत्तम प्रकारे सुरू आहे. कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन, ‘माझे गाव कोरोनामुक्त’ अभियान, भूजल व्यवस्थापन हा कार्यक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजनेने एक आदर्श घालून दिला आहे.

यावेळी जिल्ह्याचे समन्वयक प्रा. संजय पाटील, डॉ. प्रमोद चौगुले, डॉ. राजेंद्र रायकर उपस्थित होते.

फोटो : २५ डीवायपी

कसबा बावडा : शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वार्षिक आढावा नियोजन बैठकीचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून झाले. यावेळी डॉ. प्रमोद चौगले, डॉ. राजेंद्र रायकर, जिल्हा समन्वयक प्रा. संजय पाटील, अभय जयभाये उपस्थित होते.

Web Title: The work of the National Service Plan is inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.