शिरोळ रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:52+5:302021-03-15T04:22:52+5:30
शिरोळ : ग्रामीण भागात शिरोळ रोटरी क्लबने सातत्याने वेगळे उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक बांधिलकीतून त्यांचे ...
शिरोळ : ग्रामीण भागात शिरोळ रोटरी क्लबने सातत्याने वेगळे उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक बांधिलकीतून त्यांचे सुरू असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यास सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रविवारी शिरोळ रोटरी क्लबच्या टारे मेमोरियल सभागृहास भेट दिली. यावेळी बापुसाहेब गंगधर, अविनाश टारे यांच्या हस्ते मंत्री यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. संतोष काळे यांनी रोटरीच्या गेल्या दहा वर्षांतील कार्याची माहिती विशद केली. कार्यक्रमास बाळासो शेट्टी, डॉ. अंगराज माने, अतुल टारे, संदीप बावचे, रवि जाधव, सचिन देशमुख, धैर्यशील पाटील उपस्थित होते.
फोटो - १४०३२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथे रोटरी क्लबमध्ये आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अविनाश टारे, बापुसाहेब गंगधर, संतोष काळे, बाळासो शेट्टी उपस्थित होते.