कोल्हापुरात शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:19 PM2020-01-08T18:19:59+5:302020-01-08T18:22:25+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय सर्व कार्यालये बंद राहिली तर ...
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय सर्व कार्यालये बंद राहिली तर बँका बंद राहिल्याने कोटी रूपयांचे व्यवहार ठप्प झाले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर तर इतर कर्मचाऱ्यांनी बिंदू चौकापर्यंत मोर्चा काढला. ४५00 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद राहिल्या तर ३२ हजार शासकीय व निमशासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले. जुनी पेन्शन लागू करण्यासह इतर मागण्यांचा पुनरूच्चार यावेळी करण्यात आला.
शहरातील टाऊन हॉल परिसरामध्ये सकाळी साडे दहाच्या सुमारास सर्व संघटनांचे आंदोलक जमले. तेथे संपामागची भूमिका सांगितली गेली. त्यानंतर घोषणा देत निघालेल्या मोर्चाची सांगता बिंदू चौकामध्ये झाली. दुसरीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून निदर्शने केली.