संजय गांधी योजनेच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:28 AM2021-09-04T04:28:49+5:302021-09-04T04:28:49+5:30
हेरले : संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील निराधारांना आधार देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन आमदार राजूबाबा आवळे ...
हेरले : संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील निराधारांना आधार देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले. हेरले (ता. हातकणंगले) येथे संजय गांधी मंजूर पेन्शन वाटपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिग्रे, चोकाक, माले, हेरले आणि मौजे वडगाव येथील ७६ लाभार्थ्यांना मंजूर पेन्शन पत्राचे वाटप आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास मंडलाधिकारी संगीता कोरडे , तलाठी एस. ए. बरगाले, नितीन जाधव, विद्या इंगळे, उपसरपंच सतीश काशीद, मौजे वडगावचे सरपंच काशीनाथ कांबळे, राजू कचरे, डॉ. विजय गोरड, अर्जुन पाटील, राहुल शेटे, विद्या चव्हाण, कोतवाल महंमद जमादार, इम्रान पटेल, जावेद हजारी, भगवान कांबळे, कृष्णात सावंत, बशीर हजारी, अनिल उपाध्ये यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन हसीम मुलांनी यांनी केले, तर आभार रियाज जमादार यांनी मानले.
फोटो:
हेरले येथे संजय गांधी पेन्शन मंजूर पत्राचे वाटप करताना आमदार राजूबाबा आवळे, उपसरपंच सतीश काशीद, राजेंद्र कचरे, विजय गोरड, राहुल शेटे, अर्जुन पाटील.