‘पर्यटन’ माहिती केंद्राचे काम रिसॉर्ट बुकिंगपुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:08 AM2018-04-12T01:08:51+5:302018-04-12T01:08:51+5:30

Work of 'Tourism' information center at resort booking | ‘पर्यटन’ माहिती केंद्राचे काम रिसॉर्ट बुकिंगपुरतेच

‘पर्यटन’ माहिती केंद्राचे काम रिसॉर्ट बुकिंगपुरतेच

googlenewsNext

इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी एकीकडे नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात असताना शासनाचे पर्यटन विकास महामंडळ मात्र पिछाडीवर आहे. सुटीच्या कालावधीत येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरचे पर्यटन घडविण्यासाठी कार्यालयातून व अंबाबाई मंदिराच्या परिसरातील माहिती केंद्रातून पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वाटप आणि रिसॉर्ट बुकिंगपुरतेच या महामंडळाचे कार्य मर्यादित राहिले आहे.
धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट आणि निसर्गाचे वरदान लाभलेले कोल्हापूर म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्तम ठिकाण. अंबाबाई आणि जोतिबा या मंदिरांची ख्याती जगभर पोहोचल्याने कोल्हापूरला येणाºया भाविकांची संख्या वर्षागणिक वाढली आहे. कोल्हापूरला वर्षाकाठी किमान ५० लाख भाविक भेट देतात. येथे आलेल्या भाविकांचे पर्यटकांत रूपांतर व्हावे, त्यांनी केवळ देवीचे दर्शन घेऊन न परतता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहावीत, दोन-तीन दिवस वास्तव्य करावे आणि पर्यायाने कोल्हापूरची पर्यटनवृद्धी व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्वत: पुढाकार घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ ही सहल उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहे.
एकीकडे हे प्रयत्न होत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात पर्यटनवृद्धीची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने कांहीही केले जात नसल्याचे उदासवाणे चित्र आहे. कोल्हापुरातील उद्योग भवनच्या इमारतीत पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय आहे; पण सर्वांत जास्त भाविकांची संख्या अंबाबाई मंदिर परिसरातच असल्याने येथे २०१६ च्या नवरात्रौत्सवात पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्यात आले. येथे येणाºया भाविकांना या माहिती केंद्रातर्फे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती असलेले माहितीपत्रक दिले जाते. ज्यांची इच्छा असेल त्यांना महामंडळाच्या रिसॉर्टचे बुकिंग करून दिले जाते. एवढेच काय ते महामंडळाचे आणि माहिती केंद्राचे काम! कोल्हापुरातील पर्यटन स्थळांचीही माहिती येथून दिली जाते; पण शहरातून त्या ठिकाणी कसे जायचे, वाहतुकीची सोय कशी आहे, माफक दरांत निवासासह हॉटेल, खाद्यपदार्थांची उपलब्धता, खरेदीची योग्य ठिकाणे यांबाबत पर्यटकांना काहीच माहिती नसते.
तशी कोणतीही सोय पर्यटन विकास महामंडळाकडून केली
जात नाही. त्यामुळे फार-फार तर न्यू पॅलेस, रंकाळासारखी जवळची ठिकाणे पाहून भाविक परतीच्या प्रवासाला लागतात.

स्थानिक नागरिकांकडून बुकिंग
या माहिती केंद्राचा सर्वाधिक उपयोग स्थानिक नागरिकांना होतो. त्यांना सुटीच्या कालावधीत पर्यटनाला जायचे असेल तर ते या केंद्रातून माहिती पुस्तिका नेतात आणि रिसॉर्टचे बुकिंग करतात. अशा रीतीने गेल्या वर्षभरात केंद्रातर्फे १०० ते १२५ स्थानिक नागरिकांनी रिसॉर्टचे बुकिंग केले आहे.
बससेवा बंद : वास्तविक कोल्हापूरला पर्यटकांची मोठी पसंती मिळत असल्याने पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना अधिक सोईसुविधा देण्यासाठी तसेच त्यांना विनासायास पर्यटनस्थळांपर्यंत नेऊन परत आणण्यासाठी विशेष बससेवा सुरू करणे गरजेचे आहे. दहा वर्षांपूर्वी भवानी मंडपातून अशी बससेवा दिली जात होती. मात्र ती बंद करण्यात आली.

Web Title: Work of 'Tourism' information center at resort booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.