वीरशैव समाजाचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:01+5:302021-03-23T04:25:01+5:30
कोल्हापूर : पिढीजात व्यवहार सांभाळून सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग, कला, क्रीडा क्षेत्रात वीरशैव समाजाने अल्पावधीतच लक्षणीय प्रगती केली आहे. ...
कोल्हापूर : पिढीजात व्यवहार सांभाळून सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग, कला, क्रीडा क्षेत्रात वीरशैव समाजाने अल्पावधीतच लक्षणीय प्रगती केली आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन वीरशैव को-ऑप बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे यांनी केले. वीरशैव लिंगायत समाजाच्या ‘जीवनसाथी’ या मासिकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे होते.
सोलापुरे म्हणाले, समाजाने संघटित शक्तीच्या बळावर विविध उपक्रम राबवून ते यशस्वी केले. रुद्रभूमी परिसर विकासाचे काम हे राज्यातील एक आदर्श विकास काम ठरेल. यावेळी ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे, ॲड. सतीश खोतलांडे, राहुल नष्टे, राजेश पाटील-चंदुरकर, सुभाष चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव राजू वाली यांनी स्वागत केले. राजेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. मीनाक्षी कदम यांनी आभार मानले.
फोटो : २२०३२०२१-कोल-वीरशैव
ओळी : कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या ‘जीवनसाथी’ मासिकाचे प्रकाशन अनिल सोलापुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नानासाहेब नष्टे, सुनील गाताडे, राजेश पाटील, राजू वाली, रंजना तवटे, मीनाक्षी कदम उपस्थित होत्या.