महिला सबलीकरणाचे काम कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:14+5:302020-12-28T04:13:14+5:30
महिला सबलीकरणाचे काम कौतुकास्पद - करवीर पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे वाकरे ग्रामपंचायतीकडून महिला कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम. लोकमत ...
महिला सबलीकरणाचे काम कौतुकास्पद - करवीर पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे
वाकरे ग्रामपंचायतीकडून महिला कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) ग्रामपंचायतीने महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील शेतात राबणाऱ्या महिलांची कार्यकुशलता वाढविणे गरजेचे असल्याचे मत करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे यांनी व्यक्त केले.
वाकरे ग्रामपंचायतीने गावातील अंगणवाडींंना तिजोरीचे वाटप केले. तसेच गावातील महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून अश्विनी धोत्रे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील, सुभाष सातपुते, पंचायत समिती सदस्या यशोदा पाटील उपस्थित होत्या.
यावेळी सरपंच वसंत तोडकर म्हणाले, गावाचा सर्वांगीण विकास महत्वाचा आहे. त्यात महिलांनी सहभाग घेतला तर गती मिळू शकते. याचसाठी अंगणवाडी सेविका, आशासेविका यांना प्रोत्साहन देण्याचे काम वाकरे ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. १४ व्या वित्त आयोगातून तिजोरी वाटप तसेच गावातील महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देणे सुरू आहे. यापुढेही असे महिलाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल रसिका पाटील यांचा उपसरपंच शारदा पाटील यांनी तर सदस्य विजय पोवार यांनी सुभाष सातपुते यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमन पाटील, सिंधूताई कांबळे उपस्थित होत्या. ग्रामविकास अधिकारी संभाजी पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
(फोटो)
वाकरे (ता. करवीर) येथे अंगणवाड्यांना सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते तिजोरीचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, रसिका पाटील, सरपंच वसंत तोडकर, ग्रामविकास अधिकारी संभाजी पाटील उपस्थित होते.