कुस्ती मल्ल विद्या महासंघाचे काम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:13 AM2021-02-05T07:13:03+5:302021-02-05T07:13:03+5:30

कोल्हापूर : कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या माध्यमातून कुस्ती प्रसाराचे काम गेले काही वर्षांपासून सुरू आहे. त्यांचा कुस्ती प्रचाराचा हा ...

The work of Wrestling Federation is commendable | कुस्ती मल्ल विद्या महासंघाचे काम कौतुकास्पद

कुस्ती मल्ल विद्या महासंघाचे काम कौतुकास्पद

googlenewsNext

कोल्हापूर : कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या माध्यमातून कुस्ती प्रसाराचे काम गेले काही वर्षांपासून सुरू आहे. त्यांचा कुस्ती प्रचाराचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन अर्जुनवीर मल्ल व ज्येष्ठ प्रशिक्षक काका पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ कोल्हापूरच्या वतीने आंबेवाडी येथील दत्त समर्थ हाॅलमध्ये रविवारी आयोजित केलेल्या कुस्तीगिरांच्या राज्यव्यापी मेळाव्यात ते बोलत होते. स्वागताध्यक्ष अर्जुनवीर व पोलीस उपाधीक्षक राहुल आवारे होते.

पवार म्हणाले, आजच्या काळात कुस्ती जगली पाहिजे याकरिता अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यात गणेश मानुगडे यांनी मल्ल विद्या महासंघाच्या रूपाने सातत्याने नवे प्रयोग करून कुस्तीला चालना देण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केले आहे. त्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. कुस्ती पुन्हा एकदा घराघरात रुजविण्यासाठीचा या उपक्रमाला आमचाही हातभार लावू. त्यांच्यासह आम्हीही कुस्ती प्रसारासाठी प्रयत्न करू. प्रास्ताविक महासंघाचे संस्थापक गणेश मानुगडे व संग्राम कांबळे यांनी केले. यावेळी ऑलिम्पिकवीर बंडा पाटील रेठरेकर, महाराष्ट्र केसरी अप्पा कदम, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ, आनंद धुमाळ, डाॅ. प्रकाश पवार, राहुल चौगुले, वैभव लांडगे, पृथ्वीराज पवार, रणजित जाधव, विश्वास हारुगले, महिला आघाडीच्या अश्विनी बोराडे, रिमा शेळके, अनिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या पहिल्या वहिल्या राज्यव्यापी मेळाव्यास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यात महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

चौकट

कुस्तीमध्ये सराव किंवा कुस्तीदरम्यान झालेल्या दुखापतींमध्ये बहुतांशी गुडघ्याचे स्नायूच्या दुखापती अधिक आहेत. अशा दुखापतींवर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत नाही. अशा ८७ यशस्वी शस्त्रक्रिया पुण्यातील डाॅ. सुजित निलेगावकर यांनी केल्या आहेत. त्यांचाही या मेळाव्यात विशेष सत्कार करण्यात आला.

ठराव असे,

- कुस्तीतील जगज्जेत्यांची जयंती साजरी करणार

- खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी देशव्यापी केंद्रीयस्तरावर प्रयत्न

-राज्यातील प्रत्येक घरात कुस्ती पोहोचविण्यासाठी लाइव्ह माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करणार

- वेगवेगळ्या भाषेत कुस्तीचे साहित्य प्रसारित करणे

- नवोदितांसाठी जास्तीत जास्त स्पर्धा आयोजन, प्रोत्साहन कार्यक्रम

फोटो : ३१०१२०२१-कोल-कुस्ती

ओळी : कोल्हापुरातील आंबेवाडी (ता. करवीर) येथील दत्त समर्थ हाॅलमध्ये रविवारी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यव्यापी मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ मल्ल काका पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी रणजित जाधव, चंद्रहार पाटील, राहुल आवारे, बंडा पाटील रेठेरेकर, गणेश मानुगडे, अप्पा कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.

(छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: The work of Wrestling Federation is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.