नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात पेटवून घेतलेल्या कार्यकर्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 04:37 PM2020-10-26T16:37:42+5:302020-10-26T17:10:25+5:30
ichlkarnaji, crimenews, fire, suicide, kolhapurnews इचलकरंजी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने घंटागाडीचालकाकडून झालेल्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ व मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी नगरपालिकेच्या दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वारात पेटवून घेतले. ते भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण या सामाजिक कार्यकर्त्याचा काही तासातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. नरेश भोरे असे त्यांचे नाव आहे.
इचलकरंजी : येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने घंटागाडीचालकाकडून झालेल्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ व मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी नगरपालिकेच्या दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वारात पेटवून घेतले. ते भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण या सामाजिक कार्यकर्त्याचा काही तासातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. नरेश भोरे असे त्यांचे नाव आहे.
या घटनेमुळे पोलिस, नगरपालिका प्रशासन, कर्मचारी, तसेच नागरिकांत एकच धावपळ उडाली. पोलिस व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पोते टाकून तसेच अग्निरोधक बंबातील पावडरचा मारा करून आग विझवली. तोपर्यंत ते भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण या सामाजिक कार्यकर्त्याचा काही तासातच उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, आठ दिवसांपूर्वी शहापूर परिसरातून एका घंटागाडीचालकाने मेलेले डुकर घंटागाडीला बांधून रस्त्यावरून ओढत नेत होता. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते भोरे यांनी त्याला या वस्तीतून तू असे मृत डुकर ओढत नेवू नकोस, म्हणून अटकाव केला. त्यावर चिडून संबंधित चालकाने भोरे यांना शिवीगाळ व मारहाण केली.
या प्रकाराच्या निषेधार्थ भोरे यांनी नगरपालिकेला संबंधित ठेकेदार कंपनीवर पेटा अॅनिमल कायद्यांतर्गत कारवाई करावी व संबंधित घंटागाडीचालकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चार दिवसांपूर्वी केली होती. त्यामध्ये कारवाई न झाल्यास २६ आॅक्टोबरला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार सोमवारी भोरे यांनी नगरपालिकेच्या दक्षिण बाजूच्या पार्किंग मार्गातून आत प्रवेश करून स्वत:ला पेटवून घेतले. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसह नगरपालिका कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. धावपळ करत पोलिसांनी पोते टाकून आग विझविण्यासह त्यांच्या अंगावरील जळालेले कपडे फाडले. तोपर्यंत अग्निरोधक बंबाचा वापर करून एका कर्मचाºयाने पावडरचा फवारा केला व आग विझवून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, पण या सामाजिक कार्यकर्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.