कामगारांचा सात दिवसांचा पगार कपात करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:22+5:302021-06-05T04:18:22+5:30

कणेरी : कोरोना महामारीमुळे जिल्ह्यामध्ये संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १६ ते २३ मे दरम्यान कडक लॉकडाउन ...

Workers should not have their pay cut for seven days | कामगारांचा सात दिवसांचा पगार कपात करू नये

कामगारांचा सात दिवसांचा पगार कपात करू नये

Next

कणेरी : कोरोना महामारीमुळे जिल्ह्यामध्ये संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १६ ते २३ मे दरम्यान कडक लॉकडाउन लागू करण्यात आला होता. या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतील बहुतांश सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले होते. ज्यामुळे कामगारांचा रोजगार बुडाला असला तरीही बंद काळातील सरसकट पगार कपात करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबतचे निवेदन कोल्हापूर दक्षिण विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी गोकूळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पाटील व मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल हातकलंगले इंडस्ट्रियल एरियाचे अध्यक्ष गोरख माळी यांना दिले.

निवेदनात म्हंटले आहे की, औद्योगिक वसाहतीतील कामगार संसर्गाच्या कठीण काळातही जीवाची बाजी लावून सेवा बजावत आहेत. या काळात काही कामगारांचा जीवालाही धोका होवू शकतो तरी कामगार कामावर हजर राहतात. कोरोना काळात उत्पन्न घटल्याने व औषधोपचारांचा खर्च वाढल्याने अनेक कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या असून कामगारांच्या हितासाठी सरसकट पगार कपात करू नये, अशी विनंती केली आहे.

यावेळी संघटक फिरोज सौदागर, प्रदेश प्रतिनिधी सदस्य निरंजन कदम, उपाध्यक्ष सुरेश माने, दिलावर पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

०४गोकूळ शिरगाव राष्ट्रवादी निवेदन

फोटो

गोकूळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशीमा) चे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांना कामगारांचा सरसकट पगार कपात करू नये, असे निवेदन देताना नितीन पाटील यांच्यासह कार्यकर्ते.

Web Title: Workers should not have their pay cut for seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.