कामगारांनी कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:28 AM2021-09-05T04:28:33+5:302021-09-05T04:28:33+5:30
कामगार विभागातर्फे येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड, सुरक्षा किट वाटप व पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य ...
कामगार विभागातर्फे येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड, सुरक्षा किट वाटप व पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य वितरणप्रसंगी ते बोलत होते. विधी व न्याय आणि कामगार विभागातर्फे गोरगरीब जनतेसह कामगारांसाठी सुरू केलेल्या योजनांचा आढावाही या वेळी मुश्रीफांनी घेतला.
मुश्रीफ म्हणाले, माथाडी व यंत्रमाग कामगारांसह ऊसतोडणी मजुरांसाठीही कल्याणकारी योजना सुरू केली आहे. लवकरच शेतमजुरांसह सुरक्षारक्षक, वृत्तपत्र विक्रेते, हॉटेल कामगार आणि एसटीसह खासगी वाहनांवरील चालकांसाठीही कल्याणकारी योजना सुरू करणार आहोत.
कार्यक्रमास डीवायएसपी गणेश इंगळे, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, गटविकास अधिकारी शरद मगर, किरण कदम, हारुण सय्यद, उदय जोशी, वसंत यमगेकर, शर्मिली पोतदार, ऊर्मिला जोशी, सुनीता नाईक, महेश सलवादे आदींसह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
सहा. कामगार आयुक्त संदेश आयरे, सुरेश कोळकी यांचीही भाषणे झाले.
गुंड्या पाटील यांनी स्वागत केले. सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. रफिक पटेल यांनी सूत्रसंचलन केले. सिद्धार्थ बन्ने यांनी आभार मानले.
चौकट :
मोदींकडून नव्हे, मुश्रीफांकडून !
कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर बँकेत जमा होईल. परंतु, ती रक्कम मोदींकडून नव्हे तर मुश्रीफांकडून मिळाली आहे हे कळण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना आपण अनुदान मंजुरीचे लेखी पत्रही देणार आहोत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. त्यामुळे सभास्थळी खसखस पिकली.
पालिकेची निवडणूक लक्षात ठेवा..!
कामगारमंत्री पदाच्या कारकिर्दीत आपण बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी बोनस सुरू केला होता. तो युतीच्या काळात बंद झाला. आपण यंदापासून पुन्हा बोनस सुरू करणार आहोत. पण, दिवाळीनंतर नगरपालिकेची निवडणूक आहे. हेही लक्षात ठेवावे, अशी टिपणीही मुश्रीफ यांनी दिली.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बांधकाम कामगारांच्या मुलांना आर्थिक मदत वितरीत करण्यात आली. या वेळी दिनेश आयरे, उदय जोशी, सतीश पाटील, किरण कदम, सुरेश कोळकी आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०४०९२०२१-गड-०८