कामगारांनी दारात हात धुतला अन् झाली हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:59 PM2020-09-07T17:59:59+5:302020-09-07T18:01:14+5:30
बांधकाम कामगारांनी दारात हात धुतला, अन् तेच निमित्त वादाचे ठरले. कामगारांना शिवीगाळ केल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राला लाथा-बुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करण्यात आली. ही घटना करवीर तालुक्यातील केर्ले येथे घडली. यामध्ये दोघे जखमी झाले असून सागर सर्जेराव पोवार (रा. केर्ले) यांनी करवीर पोलिसांत तक्रार दिली.
कोल्हापूर : बांधकाम कामगारांनी दारात हात धुतला, अन् तेच निमित्त वादाचे ठरले. कामगारांना शिवीगाळ केल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राला लाथा-बुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करण्यात आली. ही घटना करवीर तालुक्यातील केर्ले येथे घडली. यामध्ये दोघे जखमी झाले असून सागर सर्जेराव पोवार (रा. केर्ले) यांनी करवीर पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केर्ले येथे सागर सर्जेराव पोवार यांचे घराचे बांधकाम सुरू आहे. कामगारांनी दारात हात धुतले. याचे निमित्त धरुन सर्जेराव बाबासाहेब पोवार यांनी कामगारांना शिवीगाळ केली.
याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सागर व सर्जेराव दत्तू पोवार या दोघांना लाथा-बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहूल पोवार, वैभव पोवार, बाबू पोवार, सर्जेराव पोवार यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, याबाबत राहूल पोवार याने दिलेल्या तक्रारीनुसार सर्जेराव दत्तू पोवार, सागर पोवार, सुरेखा सागर पोवार, विजया सर्जेराव पोवार यांच्यावर गुन्हे नोंदविले आहेत.