कार्यकर्तेच विजयाचे ‘शिल्पकार’

By admin | Published: October 23, 2014 12:35 AM2014-10-23T00:35:19+5:302014-10-23T00:44:09+5:30

जिल्ह्यातील चित्र; अखेरच्या टप्प्यात वापरलेली सर्व आयुधेच निर्णायक

Workers' Winning 'Craftsman' | कार्यकर्तेच विजयाचे ‘शिल्पकार’

कार्यकर्तेच विजयाचे ‘शिल्पकार’

Next

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यात उमेदवारांना नातेवाइकांबरोबर कार्यकर्त्यांची मेहनत कामी आली. दहाही मतदारसंघांत कार्यकर्तेच विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके यांचा विजय दृष्टिक्षेपात आणण्यासाठी ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके व ‘कुंभी’ बॅँकेचे अध्यक्ष अजित नरके या दोघांनी मतदारसंघात केलेली बांधणी महत्त्वाची ठरली. चंदगड विधानसभा मतदारसंघात संध्यादेवी यांच्या आमदारकीसाठी स्वर्गीय कुपेकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केलेच; पण कन्या डॉ. नंदा बाभूळकर व उदय जोशी यांनी खूप कष्ट घेतले.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात अमल महाडिक यांच्यासाठी आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांना उघड प्रचारात येणे अवघड होते. त्यांच्या प्रचाराची धुरा प्रा. जयंत पाटील यांनी खांद्यावर घेतली होती. त्यांच्या जोडीला महाडिकप्रेमी कार्यकर्ते होते. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या प्रचारयंत्रणेवर त्यांनी व नवीद मुश्रीफ यांनी नियंत्रण ठेवले होते. प्रवीणसिंह पाटील, सतीश पाटील, भैया माने, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, शशिकांत खोत यांची भूमिका महत्त्वाची राहिली. कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी शिवसैनिकांसह पत्नी वैशाली क्षीरसागर व ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रयत्न केले. इचलकरंजीमध्ये सुरेश हाळवणकर यांचा विजय शहर विकास आघाडीमुळे, तर शिरोळमध्ये शिरोळ बहुजन विकास आघाडीने उल्हास पाटील यांना विजयापर्यंत नेले. ‘गुरुदत्त’चे माधवराव घाटगे, सुरेश पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली. राधानगरीमध्ये युवा वर्गाने प्रकाश आबिटकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

असे ठरले विजयाचे शिल्पकार
उमेदवारमतदारसंघ शिल्पकार
अमल महाडिकदक्षिणप्रा. जयंत पाटील
राजेश क्षीरसागरउत्तरवैशाली क्षीरसागर व ऋतुराज क्षीरसागर
चंद्रदीप नरके करवीरअरुण नरके व अजित नरके
संध्यादेवी कुपेकरचंदगडनंदा बाभूळकर व उदय जोशी
सत्यजित पाटीलशाहूवाडीरणवीरसिंह मानसिंगराव गायकवाड
उल्हास पाटील शिरोळ माधवराव घाटगे, सुरेश पाटील
सुरेश हाळवणकरइचलकरंजीशहर विकास आघाडी
हसन मुश्रीफकागलदुसऱ्या फळीतील कार्यकर्ते
प्रकाश आबिटकरराधानगरीयुवा कार्यकर्ते
सुजित मिणचेकरहातकणंगलेसंजय पाटील, महेश चव्हाण,
प्रवीण यादव, संजय चौगले

Web Title: Workers' Winning 'Craftsman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.