‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’ची उद्या कार्यशाळा

By admin | Published: June 18, 2015 01:18 AM2015-06-18T01:18:38+5:302015-06-18T01:19:58+5:30

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : पुणे विभागातील अधिकारी-पदाधिकाऱ्यांचा सहभाग

Workshop on 'Clean Maharashtra Campaign' tomorrow | ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’ची उद्या कार्यशाळा

‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’ची उद्या कार्यशाळा

Next

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी)च्या धर्र्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अभियानाचाच भाग म्हणून पुणे विभागातील सर्व महानगरपालिकांचे महापौर व आयुक्त आणि नगरपालिकांचेनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची एक दिवसाची कार्यशाळा उद्या, शुक्रवारी होणारआहे. शिवाजी विद्यापीठातील शाहू सभागृहात (सिनेट हॉल) सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत ही कार्यशाळा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विभागाच्या ‘संकल्प स्वच्छतेचा’ या कार्यक्रमाचे आयोजनही यावेळीच करण्यात आले आहे. पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्णांतील पाच महानगरपालिकांचे महापौर व आयुक्त आणि ४१ नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छतेचा संकल्प करून होणार आहे. या कार्यशाळेस नगरविकास विभागाच्या सचिव आणि अभियानाच्या नोडल सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, तसेच नगरपालिका प्रशासनाच्या संचालक व आयुक्त मीता राजीव लोचन मार्गदर्शन करणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध शास्त्रोक्त पद्धतींविषयी माहिती देण्यात येणार आहे.
शहरे स्वच्छ व्हावीत, यासाठी कचऱ्याचे संकलन, वर्र्गीकरण आणि विल्हेवाट लावणे, शंभर टक्के शौचालयाचाच वापर करण्यासाठी प्रवृत्त करणे, कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया, सांडपाण्यावर प्रक्रिया, स्वच्छ व हरित महाराष्ट्र साकारणे, व्यापक लोकसहभाग मिळवणे आणि सहभागाचा ठाम निर्धार ही संकल्पना रूजवण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या सप्तपदी स्वच्छतेची ही संकल्पना पुढे आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Workshop on 'Clean Maharashtra Campaign' tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.