वर्कशॉप घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

By admin | Published: May 24, 2016 11:24 PM2016-05-24T23:24:28+5:302016-05-25T00:32:38+5:30

एम. डी. सावंत यांची बदली : दहा दिवसांत अहवाल देण्याची आयुक्तांची सूचना

Workshop scandal order | वर्कशॉप घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

वर्कशॉप घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

Next

चंद्रकांत शेळके, अहमदनगर
‘थंडगार पाणीबॉटल, आईस्क्रिम, गरमागरम वडे, चाय, चने-फुटाणे’, अशा आरोळ्या देत प्रवाशांच्या आधी थेट एसटी प्रवेश करून खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बसस्थानकांत घुसखोरी केल्याचे सर्रास चित्र सर्वच बसस्थानकांत दिसते. ‘लोकमत’ने मंगळवारी स्टिंग आॅपरेशन करून यावर प्रकाश टाकला. कोणत्याही विक्रेत्याला थेट एसटीत किंवा एसटीजवळ जाऊन खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी नसताना या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले.
एसटी प्रशासनाने ज्या काही स्टॉलधारकांना खाद्यपदार्थ विकण्यासाठी परवाने दिले आहेत, त्यांनी प्लॅटफॉर्म सोडून किंवा एसटीत प्रवेश करून खाद्यपदार्थ विकू नयेत असे आदेश एसटीच्या महाव्यवस्थापकांनी दिलेले आहेत. चालक व वाहकांनी फेरीवाल्यांना बसमध्ये चढण्यास मज्जाव करावा, तसेच असे प्रकार आढळल्यास विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना आगार व्यवस्थापकांना दिल्या असल्या तरी त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे आढळले. तारकपूर बसस्थानकात पाहणी केली असता फेरीवाले बिनधास्तपणे एसटीत प्रवेश करत होते. एवढेच नव्हे तर प्रवाशांना एसटीत चढ-उतार करण्यास याच विक्रेत्यांमुळे अडथळा होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. कोणत्याही बसने स्थानकात प्रवेश केला की ही फेरीवाल्यांची झुंड एसटीवर जणू तुटून पडत होती. काहीजण खिडकीतून, तर काहीजण थेट एसटीत चढून प्रवाशांना खाद्यपदार्थ विकत घेण्यास आग्रह करत होते. जोपर्यंत प्रवासी ‘नाही’ म्हणून मान डोलवत नाही, तोपर्यंत कर्णकर्कश आवाजात त्याच्या कानात फेरीवाले ओरडत असल्याचे चित्र होते. बसमध्ये सर्वात आधी प्रवेश करून, चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांना न जुमानता हे फेरीवाले जोपर्यंत बस निघत नाही तोपर्यंत गोंगाट करत असल्याचे आढळून आले. मुद्दामहून लहान मुलांच्या समोर आईस्क्रिम किंवा खाद्यपदार्थ घेऊन घुटमळणे, कपात चहा ओतून थेट प्रवाशांच्या तोंडापर्यंत नेणे, एखादी थंड पाण्याची बाटली खिडकीतून प्रवाशाच्या दिशेने सोडणे असे प्रकार पहायला मिळाले. मळकटलेले कपडे, दिवसभर धुळीत माखलेले तेलकट खाद्यपदार्थ अशा अस्वच्छतेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास होऊ शकतो, याचे भानही त्यांना नसते. मुळात ज्या स्टॉलधारकाला खाद्यपदार्थ विकण्याचे परवाने आहेत, त्यांनीच ते विकावे, बसस्थानकात दिवसभर धूळ असल्याने खाद्यपदार्थ उघड्यावर विकू नये, शिळे अन्नपदार्थ दुकानात ठेवू नये, असे आदेश असतानाही हेच स्टॉलधारक या फेरीवाल्यांना कमिशनवर खाद्यपदार्थ विक्रीसाठी नियुक्त करतात. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

Web Title: Workshop scandal order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.