इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टतर्फे जागतिक वारसा दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:19 AM2021-04-29T04:19:10+5:302021-04-29T04:19:10+5:30
आर्किटेक्ट शिखा जैन यांनी सिटी पॅलेस उदयपूर संवर्धन, जयपूर शहर संवर्धन आणि म्युझियम डिझाईन बद्दलची माहिती दिली. त्यांनी हेरिटेज ...
आर्किटेक्ट शिखा जैन यांनी सिटी पॅलेस उदयपूर संवर्धन, जयपूर शहर संवर्धन आणि म्युझियम डिझाईन बद्दलची माहिती दिली. त्यांनी हेरिटेज बिल्डिंग, सिटी कॉन्झर्वेशन, म्युझियम डिझाईन विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या भागात आर्किटेक्ट शिरीष बेरी, विजय कोराणे, अमरजा निंबाळकर, इंद्रजित जाधव, निला जिरगे यांनी सहभाग घेतला. पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत आपल्या देशामध्ये संवर्धनाच्या दृष्टीने भरपूर काम करणे. लोकसहभाग वाढविण्यासाठी जागृती कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचा सूर या चर्चेतून उमटला. अध्यक्ष विजय कोराणे यांनी कोल्हापूरमधील वारसा स्थळांची माहिती दिली. सचिव वंदना पुसाळकर यांनी आभार मानले. या वेबिनारमध्ये ६१ आर्किटेक्टस सहभागी झाले.
फोटो (२८०४२०२१-कोल-शिखा जैन (आयआयए)
दहावीचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळावे
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोरोनामुळे इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत द्यावे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. त्याबाबतचे निवेदन या समितीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना ऑनलाइन पाठविले आहे.
कोरोनामुळे सध्या पालक हे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून निर्णय घेऊन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तत्काळ परत करावे. यापूर्वी झालेला खर्च आणि येथून पुढे येणारा काहीप्रमाणात होणारा खर्च आपल्यामार्फत शिक्षण विभागाच्या निधीतून करावा. परीक्षा शुल्क परत न केल्यास सर्व पालक, विद्यार्थी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील, असा इशारा या समितीच्यावतीने रमेश मोरे, अशोक पोवार यांनी दिला.
===Photopath===
280421\28kol_2_28042021_5.jpg
===Caption===
फोटो (२८०४२०२१-कोल-शिखा जैन (आयआयए)