जागतिक लिंगायत महासभेची आज कोल्हापुरात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:14 AM2021-02-05T07:14:53+5:302021-02-05T07:14:53+5:30

कोल्हापूर: जनगणनेत धर्माच्या रकान्यात ‘लिंगायत’ ऐवजी ‘हिंदू’ अशी नाेंद करावी, असे अखिल भारतीय लिंगायत महासंघ असे फसवे नाव ...

World Lingayat General Assembly meeting in Kolhapur today | जागतिक लिंगायत महासभेची आज कोल्हापुरात बैठक

जागतिक लिंगायत महासभेची आज कोल्हापुरात बैठक

Next

कोल्हापूर: जनगणनेत धर्माच्या रकान्यात ‘लिंगायत’ ऐवजी ‘हिंदू’ अशी नाेंद करावी, असे अखिल भारतीय लिंगायत महासंघ असे फसवे नाव धारण करून पुरोहितांकडून सुरू असलेल्या षङ्‌यंत्राविरोधात लिंगायत समाज एकवटला आहे. या समाजाची एकमेव प्रतिनिधीक संस्था असलेल्या जागतिक लिंगायत महासभेने फसवणूक टाळण्यासाठी आज, सोमवारी दुपारी ३ वाजता चित्रदुर्ग मठात बैठक आयोजित केली आहे.

लिंगायत धर्माला अद्याप अधिकृत मान्यता मिळाली नसली तरी महात्मा बसवेश्वरांच्या विचाराने पुढे जाणारा हा समाज लिंगायत हा स्वतंत्र धर्मच मानून त्याप्रमाणे आचारण केले जात आहे. आता लवकरच राष्ट्रीय जनगणना सुरू होणार आहे. या गणनेत धर्माच्या रकान्यात धर्माची नोंद करणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर सध्या लिंगायत समाजामध्ये धर्म म्हणून ‘लिंगायत’ न लिहिता ‘हिंदू’ म्हणूनच लिहावे, असा अप्‌प्रचार सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर समाजात द्विधावस्था निर्माण झाल्याने भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज तातडीने बैठकीचे आयोजन केले आहे. धर्म रकान्यात हिंदू लिहिणे म्हणजे लिंगायत धर्म व्हावा यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला सोडून स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे, अशी भावना समाजातील जाणकारांमध्ये बळावली आहे. आजच्या या बैठकीत यावर विचारविमर्श होणार आहे तसेच यावेळी माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन करून जनजागृतीही मोहिमेचीही आखणी केली जाणार आहे.

Web Title: World Lingayat General Assembly meeting in Kolhapur today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.