कोल्हापूरच्या राष्ट्रीय लोक अदालतीत दोन जोडप्यांचे संसार पुन्हा जुळाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मध्यस्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 07:06 PM2017-12-09T19:06:40+5:302017-12-09T19:12:10+5:30
कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीमुळे दोन जोडप्यांचा संसार तुटता-तुटता वाचला. ‘न्याय सबके लिए’ या बीद्र वाक्यात प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूरने शनिवारी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते.
कोल्हापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीमुळे दोन जोडप्यांचा संसार तुटता-तुटता वाचला. ‘न्याय सबके लिए’ या बीद्र वाक्यात प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूरने शनिवारी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखल पूर्व खटल्यामध्ये दोन जोडप्यांनी संसारिक वादामुळे वाद मिटवण्याठी काही दिवसापुर्वी विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थी केंद्राकडे धाव घेतली होती. त्यावेळी दाखलपूर्व खटल्यात मध्यस्थी करिता अर्ज भरुन घेण्यात आला होता.
दोन्ही पक्षकारांना जिल्हा मध्यस्थी केंद्र, कोल्हापूरचे पॅनेल वकिल अॅड. सिद्धी नलवडे , रिटेनर अॅड. योगिता हरणे यांनी समुपदेशन केले. त्यामुळे त्यांचा वैवाहिक वाद मिटवल्यास वेळ, श्रम, पैसा वाचेल आणि बहूमुल्य नाते टिकेल याची जाणीव करुन दिली. त्यामध्ये घरातील त्रयस्थामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यांचे सुद्धा समुपदेशन जिल्हा मध्यस्थी केंद्राचे समन्वयक उमेशचंद्र मोरे यांच्याकडे करण्यात आले आणि त्यामध्ये यश आले.
या दोन जोडप्यांना एकत्र आणण्यामुळे लहान मुलांची फरपट कायमची थांबली . या दोन्ही जोडप्यांचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
समुपदेशन जिल्हा मध्यस्थीचे काम अॅड. तस्कीन पटेल यांनी पाहिले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे रिटेनर लॉयर अॅड. योगिता हरणे, अॅड. सारिका तोडकर, अॅड. शुभांगी निंबाळकर, विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक एस.एस. बाबर, जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक संभाजी पाटील, सर्जेराव सावंत , ज्ञानेश्वर मिरजकर , गुरुदास येळवडेकर, शैलेश पवार, बाळासाहेब खुपेरकर, अनिकेत मोहिते आणि सारिका शिंदे यांनी काम पाहिले. यासाठी सर्व कर्मचारी, वकील , पक्षकार यांचे सहकार्य लाभले.