कोल्हापुरात जागतिक पांढरी काठी, दृष्टिदिन, प्रेरणा दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:46 PM2017-10-16T12:46:01+5:302017-10-16T13:00:02+5:30
मिरजकर तिकटी येथील अंधशाळेत कोल्हापूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, सी. पी. आर. हॉस्पिटल यांच्यातर्फे ‘जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन’, ‘जागतिक दृष्टिदिन’ तसेच ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.
कोल्हापूर, दि. १६ : मिरजकर तिकटी येथील अंधशाळेत कोल्हापूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, सी. पी. आर. हॉस्पिटल यांच्यातर्फे ‘जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन’, ‘जागतिक दृष्टिदिन’ तसेच ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.
यानिमित्त जनजागृती फेरीचे उद्घाटन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रॅली मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी अंधशाळामार्गे पार पडली.
‘जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन’, ‘जागतिक दृष्टिदिन’ जनजागृती फेरी
या रॅलीमध्ये डॉ. एल. एस. पाटील, प्रकाश बोंद्रे, डॉ. अभिजित ढवळे, डॉ. सुजाता वैराट, डॉ. अजेट राव, डॉ. सुहास बोंद्रे, प्रकाश पाटील, वैद्यकीय पथक (आरबीएसके) अंधशाळेचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्र्थी, विद्यार्थिनी व सायबर कॉलेजचे समाजकार्य विभागाचे विद्यार्र्थी उपस्थित होते.
अंधशाळा येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अंधांचे दैवत लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष प्रकाश बोंद्रे यांनी अंधशाळेतील कार्यपद्धती व ‘पांढरी काठी दिना’चे महत्त्व उपस्थितांना पटवून सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी दैनंदिन जीवनात दृष्टीचे किती महत्त्व आहे ते सांगितले.
डॉ. अभिजित ढवळे यांनी अंधत्वाची कारणे, उपाय व ‘जागतिक दृष्टिदिना’चे महत्त्व सांगितले. यावेळी ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळाचे अध्यक्ष प्रकाश बोंद्रे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वैष्णवी अंधशाळेतील विद्यार्थिनीने ब्रेल लिपीचे वाचन केले