कोल्हापूर जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:21 AM2018-06-22T00:21:51+5:302018-06-22T00:21:51+5:30

World Yoga Day in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात

कोल्हापूर जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात

Next

कोल्हापूर : ‘जागतिक योग दिन’ गुरुवारी जिल्ह्यात साजरा झाला. विविध शाळांसह संस्थांनी योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात योग प्रात्यक्षिकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह तरुण, नोकरदार, व्यावसायिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी विविध क्षेत्रांतील लोकांनी सामूहिक योग कार्यक्रमांत सहभाग घेत ‘निरोगी आयुष्यासाठी योगासने’ असा संदेश दिला.
जयसिंगपूर
जयसिंगपूर / कुरुंदवाड / अर्जुनवाड : नांदणी (ता. शिरोळ) येथील नरदे हायस्कूल व नंदादीप बालविकास मंदिरामध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संजय जैनापुरे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे मार्गदर्शन केले. यामध्ये प्रज्ञा संवर्धनातील विविध कृती भामरी, गुंजन भामरी, कपालभारती, चंद्र सूर्य नाडी शोधन, अनुलोम, विलोम याची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली. यावेळी मुख्याध्यापिका आर. ए. कोले, बी. एस. जाधव, पी. जी. सुतार, एस. ए. गरड, एस. एस. पाटील, पी. एन. दिवटे, व्ही. एस. भगाटे, आर. जे. पाटील, वैशाली संभूशेटे, माधुरी निशाणदार, सुवर्णा ऐनापुरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
कुरुंदवाड परिसर
कुरुंदवाड : परिसरात योग दिन साजरा करण्यात आला. येथील तबक उद्यानात साने गुरुजी विद्यालयातील मुलांनी सामूहिक योगासने केली. यावेळी मुख्याध्यापक सुरेश लोखंडे, माणिक दातार, सलीम बागवान, पोलीस उपनिरीक्षक ए. बी. शिंदे, प्रेमकुमार केदार उपस्थित होते. तसेच एस. पी. हायस्कूल, महाविद्यालये, प्राथमिक शाळा, पोलीस ठाणे, शासकीय कार्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील चैतन्य पब्लिक स्कूलमध्ये योग दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष दशरथ काळे यांनी योगाचे महत्त्व विशद केले. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहते. त्यामुळे योगा प्रत्येकांनी अंगीकारला पाहिजे असे त्यांनी सांगितले. प्राचार्य शरद काळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
हेरवाड हायस्कूल येथे जागतिक योग दिवस उत्साहात पार पडला. शारीरिक स्वास्थ्य टिकवायचे असेल तर योगा महत्त्वाचा आहे. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते, असे एम. यु. डांगे यांनी सांगितले. एस. डी. तावदारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी मुख्याध्यापिका आर. आर. निर्मळे, पर्यवेक्षक सुतार, सचिन गुदले, बाळकृष्ण फल्ले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील दत्ताजीराव कदम हायस्कूल व विद्या मंदिरमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका कल्पना कदम यांनी योगाचे महत्त्व विशद केले. यावेळी बजरंग संकपाळ, अनिल चौगुले, प्रकाश कळंत्रे, आर. एच. कांबळे उपस्थित होते, तर विद्यामंदिर शाळेत जितेंद्र चौगुले यांनी योगासनाची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. याप्रसंगी सुनील मगदूम, संगीता सुतार, परशराम चव्हाण, संपदा उगारे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
इचलकरंजी परिसर
इचलकरंजी : गंगामाई विद्यामंदिरमध्ये जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता सर्व विद्यार्थी पांढऱ्याशुभ्र गणवेशात मैदानात जमले. शिक्षिका मानसी चौगुले यांनी योगदिनाची पार्श्वभूमी, महत्त्व व माहिती मुलांना सांगितली. क्रीडाशिक्षिका गीता पोकार्डे यांनी मुले व उपस्थित शिक्षक यांच्याकडून आसनांचे अनेकविध प्रकार व प्राणायाम करवून घेतले.
यावेळी अर्चना दातार, अनुराधा लक्ष्मैश्वर, जुईली जोशी, मुख्याध्यापिका संध्या सोनवणे, सुलोचना शिंदे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
श्रीमंत गंगामाई गर्ल्स् हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये योगदिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर यांनी मार्गदर्शन केले. क्रीडाप्रमुख प्रा. शेखर शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विद्यार्थिनी व शिक्षकांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. पद्मासन, भुजंगासन, वज्रासन, ताडासन, तसेच प्राणायामांच्या सादरीकरणातून शाळेतील वातावरण योगमय बनले होते. यावेळी आर. एस. पाटील, वाय. बी. बंडगर, ए. आर. कोष्टी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते. उपमुख्याध्यापक बी. आर. कांबळे यांनी आभार मानले.
राजीव गांधी विद्यामंदिर व चौगुले बालवाडीमध्ये आंतरराष्टÑीय योगदिनानिमित्त योगशिक्षिका रंजना डांगरे, शारदा जासू, ज्ञानेश्वर कोपार्डे व रावसाहेब चौगुले यांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच मार्गदर्शन केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. योगदिनी २८ योगासनांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास चौगुले, मुख्याध्यापिका सपना मेळवंकी, सुरेश माळवी, संपदा पाटील, माधुरी एकार यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
गंगानगर येथील रत्नदीप हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडाशिक्षक ए. बी. पाटील यांनी योगाचे महत्त्व सांगितले. पी. सी. कोरे यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी मुख्याध्यापक डी. ए. कांबळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: World Yoga Day in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.