घोरपडे कारखान्यात ८,०१,१११व्या साखर पोत्याचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:30 AM2021-02-27T04:30:57+5:302021-02-27T04:30:57+5:30

यावेळी अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, कारखान्याचा या हंगामातील सरासरी साखर उतारा बी हेवीसह १२.६७ टक्के इतका आहे. आजचा साखर ...

Worship of the 8,01,111st sugar sack at Ghorpade factory | घोरपडे कारखान्यात ८,०१,१११व्या साखर पोत्याचे पूजन

घोरपडे कारखान्यात ८,०१,१११व्या साखर पोत्याचे पूजन

Next

यावेळी अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, कारखान्याचा या हंगामातील सरासरी साखर उतारा बी हेवीसह १२.६७ टक्के इतका आहे. आजचा साखर उतारा १४.१ टक्के इतका आहे. कारखान्याने आजपर्यंतची बी हेवीसह उसाची एफआरपी रक्कम प्रति टनाला २,९०० रुपये अदा केली असून तोडणी-वाहतुकीची बिलेही जमा केलेली आहेत.

कारखान्याने सहवीज प्रकल्पातून (कोजनमधून) आज अखेर एकूण सहा कोटी ३२ लाख युनिट वीज उत्पादित केली आहे. त्यापैकी चार कोटी सहा लाख युनिट इतकी वीज महावितरणला निर्यात केली आहे. १५ जूनपर्यंत कोजन प्रकल्प सुरू राहणार असून, एकूण साडेआठ कोटी युनिट वीज निर्यात करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे.

डिस्टिलरीमधून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलचे करार ८० टक्के तेल कंपन्यांशी म्हणजेच एक कोटी ३३ हजार लिटरचे केलेले आहेत. कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील व सीमा भागातील सर्व ऊस उत्पादकांनी गळीतास पाठवून सहकार्य करावे, असे अवाहन नविद मुश्रीफ यांनी केले.

जनरल मॅनेजर संजय श्यामराव घाटगे, चिफ इंजिनिअर हुसेन नदाफ, चिफ केमिस्ट मिलिंद चव्हाण, शेती अधिकारी प्रतापराव मोरबाळे, डिस्टिलरी मॅनेजर संतोष मोरबाळे, कोजन मॅनेजर मिलिंद पंडे, तोडणी वाहतूक मॅनेजर एम. इनामदार, ऊस विकास अधिकारी उत्तम परीट, इलेक्ट्रिकल मॅनेजर बी. ए. पाटील, असिस्टंट अकाउंटंट विवेक पाटील, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर भूषण हिरेमठ, सिव्हिल मॅनेजर दिग्विजय पाटील, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो:-

बेलेवाडी काळम्मा (ता.कागल) येथील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात या हंगामात उत्पादित ८,०१,१११व्या पोत्याचे पूजन करताना करताना शेतकऱ्यांसोबत अध्यक्ष नवीद मुश्रीफ व अधिकारी वर्ग.

***

Web Title: Worship of the 8,01,111st sugar sack at Ghorpade factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.