नृसिंहवाडीत आराधना महोत्सवास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:43+5:302021-07-05T04:15:43+5:30

११ जुलै अखेर चालणाऱ्या या उत्सवात दररोज सकाळी आठ वाजतापासून मन्यू सूक्त, श्रीसूक्त, सौर सूक्त, गणपती अथर्वशीर्ष, रुद्र ...

Worship festival begins at Nrusinhwadi | नृसिंहवाडीत आराधना महोत्सवास सुरुवात

नृसिंहवाडीत आराधना महोत्सवास सुरुवात

googlenewsNext

११ जुलै अखेर चालणाऱ्या या उत्सवात दररोज सकाळी आठ वाजतापासून मन्यू सूक्त, श्रीसूक्त, सौर सूक्त, गणपती अथर्वशीर्ष, रुद्र आदींची आवर्तने व ऋग्वेद संहिता पारायण, द्विसाहस्त्री गुरुचरित्र, श्रीमद् गुरुचरित्र आदी पारायणे आगदी मोजक्या ब्रह्मवृंदामार्फत भाविकांशिवाय होणार आहेत. दुपारी बारा वाजता प. प. टेंबेस्वामी महाराजांची महापूजा त्यानंतर वेदशास्त्र संपन्न दिलीपशास्त्री उपाध्ये यांचे पुराण व हरी भक्त परायण शरदबुवा घाग यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर पालखी सोहळा होणार आहे. उत्सवसांगतेवेळी होणारी ग्रामदिंडी व महाप्रसाद रद्द करण्यात आल्याचे अध्यक्ष मेघशाम पुजारी व सचिव महादेव पुजारी यांनी संगितले.

फोटो - ०४०७२०२१-जेएवाय-०२

फोटो - नृसिंहवाडी येथे श्री परमहंस परिव्राजिकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची बांधण्यात आलेली पूजा. (छाया - प्रशांत कोडणीकर)

Web Title: Worship festival begins at Nrusinhwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.