Navratri2022: खंडेनवमीनिमित्त अंबाबाईची विश्वेश्वरी जगदात्री रुपात पूजा

By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 4, 2022 05:13 PM2022-10-04T17:13:54+5:302022-10-04T17:20:40+5:30

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला भाविकांचा ओघही कमी झाला.

Worship of Ambabai as Visveshwari Jagdatri on the occasion of Khandenavami | Navratri2022: खंडेनवमीनिमित्त अंबाबाईची विश्वेश्वरी जगदात्री रुपात पूजा

Navratri2022: खंडेनवमीनिमित्त अंबाबाईची विश्वेश्वरी जगदात्री रुपात पूजा

Next

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात खंडेनवमीनिमित्त आज, मंगळवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगदात्री रूपात पूजा बांधण्यात आली. तसेच देवीच्या पारंपारिक शस्त्रांची पूजा करण्यात आली. अष्टमीच्या जागरामुळे मंदिर सकाळी ९ वाजता उघडले. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला भाविकांचा ओघही कमी झाला.

अष्टमीच्या मध्यरात्री देवीचे महिषासुराचा वध केल्याने या दिवशी जागराचा होम होतो. त्यामुळे खंडेनवमीला सकाळी ९ वाजता मंदिर उघडले. त्यानंतर देवीचा अभिषेक दुपारची आरती झाल्यावर सालंकृत पूजा बांधण्यात आली.

विश्वेश्वरी म्हणजे विश्वाची ईश्वरी. जगाला धारण करणारी म्हणजे जगदधात्री. श्री ब्रम्हांड पुराणातील श्री ललिता सहस्त्रनामस्तोत्रात विश्वमाता जगद्धात्री अशी देवीची नावे आहेत. विश्वाची निर्मिती आदिशक्तीने केली.. म्हणून पूजेत विश्व व पृथ्वीच्या गोलाद्वारे जग प्रतिकात्मक रुपाने दाखवले आहे. देवीची मातृवत्सल कृपादृष्टी ही जगावर आहे हे देवीच्या दृष्टीसमोर पृथ्वी ठेऊन दाखले आहे. ही पूजा गजानन मुनीश्वर व मयूर मुनिश्वर यांनी बांधली.

Web Title: Worship of Ambabai as Visveshwari Jagdatri on the occasion of Khandenavami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.